विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचे ठेवलं हे अनोखे नाव, फोटो शेअर करून केले बारसे!!

11 जानेवारीला अनुष्का शर्मा आणि विराट कोहली एका मुलीचे पालक बनले आहेत, आणि आता त्यांनी आपल्या मुलीचा पहिला फोटो लोकांसोबत शेअर केला आहे. सोशल मीडियावर आपल्या मुलीचा फोटो शेअर करताना त्याांनी मुलीचे नावही उघड केले आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या मुलीचे नाव वामिका ठेवले आहे.

अनुष्का शर्मा ने तिच्या इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे मुलीच्या नावाची माहिती लोकांना दिली. व तीचा विराटचा आणि वामिकाचा फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि अनुष्काने आपल्या मुलीला हातात घेतले आहे आणि प्रेमळ नजरेने तिला पहात आहेत.

अनुष्का शर्माने विराट आणि तिच्या मुलीसोबत घेतलेला हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, आणि शेअर करताना लिहिले आहे की, “आम्ही प्रेमात एकत्र आहोत, ‘वामिका’ च्या आगमनाने आमच्या प्रेमाला आणि विश्वासाला एक नवीन दर्जा मिळाला आहे. काही क्षणातच अश्रू, आनंद, चिंता या प्रत्येक गोष्ट लक्षात आली. आमची झोप उडाली आहे परंतु मन भरलेलं आहे. तुमच्या प्रेमा बद्दल आणि प्रार्थनेबद्दल मनापासून आभार.

अनुष्का शर्माच्या या पोस्टला बर्‍याच लोकांनी लाइक दिल्या आहेत आणि प्रत्येकजण त्यांचे अभिनंदन करत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करताना घरातल्या छोट्या पाहुण्याच्या आगमनाबद्दल लोकांना माहिती दिली होती.

यानंतर आयपीएल सुरू झाला आणि अनुष्का शर्मा विराट बरोबर दुबईला गेली. दुबईहून आल्यानंतर अनुष्का शर्मा तिच्या शूटिंगच्या उर्वरित कामात व्यस्त झाली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरीजसाठी विराट ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. मात्र, मुलीच्या जन्मामुळे विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या सीरीज पैकी पहिला सामना खेळल्यानंतर तो भारतात परतला.

विराट भारतात आल्यानंतर काही आठवड्यांनंतर अनुष्का शर्माने एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचा जन्म मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात झाला. मुलीच्या जन्मानंतर विराटने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून ही बातमी दिली. पोस्टमध्ये त्यानी लिहिले होते की, “आज दुपारी आम्हाला मुलगी झाली आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. अनुष्का आणि मुलगी दोघेही ठीक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.