अभिनेत्री काजल अग्रवालची बहीण ‘निशा’, काजल ला खूपच मिस करत आहे, हे निशाच्या इंस्टाग्राम अकाउंट वरील कॅपशन द्वारे दिसत आहे. निशा अग्रवाल नी अलीकडेच दोघींचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, त्यातील एक काजलच्या रियल वेडिंगचा आहे तर दुसरा रील वेडिंगचा आहे. पहिल्या फोटोमध्ये निशा आणि काजल ह्या झोपाळ्यावर बसलेल्या दिसत आहेत, जे नुक्तेच झालेल्या विवाह सोहळ्यातील आहे. या चित्रात काजल लाल रंगाचा पोशाख परिधान केलेली दिसत आहे आणि तिचे केस तिच्या पाठीमागे बांधलेले आहेत तर निशा तिच्या पाठीमागे उभी असलेली दिसत आहे.
दुसरे चित्र जुन्या कमर्शियलचे आहे, ज्यामध्ये काजल आणि निशाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या जाहिरातीमध्ये काजलने वधूची भूमिका केली होती, ज्यामध्ये ती भारी सोन्याचे दागिने परिधान करताना दिसत आहे. निशाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की रियल व्हर्सेस रील. याआधीही निशाने काजलच्या लग्नाचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. काजल आणि तिचा नवरा गौतमसोबत फोटो काढत,निशाने लिहिले की तुम्ही दोघेही आयुष्यात एक नवीन प्रवास सुरू करत आहात, ते नेत्रदीपक, आश्चर्यकारक, अविश्वसनीय आणि अविस्मरणीय असू द्या.तुम्हा दोघांचे आयुष्य प्रेमाने भरलेले असू द्या….
30 ऑक्टोबरला काजल अग्रवालने गौतम किचलू बरोबर सात फेर्या घेतल्या. लग्नानंतर ‘सिंघम’ फेम,काजलने तिची बरीच छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली. लग्नाच्या दिवशी तिने डिझायनर अनामिका खन्नाचा लेहंगा परिधान केला होता. काजलने पारंपारिक लाल आणि गुलाबी लेहंगा घातला होता.भारी दागिनेही परिधान केले होते. छायाचित्रांसह तिने एका पोस्ट द्वारे डिझायनरचे आभार मानले.
लग्नानंतर काजल तिचे बरेच फोटो शेअर करत आहे. काजलने पती गौतम किचलूसोबत काही रोमँटिक छायाचित्रे शेअर केली. या दोघांची केमिस्ट्री खूपच सुंदर दिसत आहे. काजलने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका चित्रात तिने गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता. यासह तिने मोठे कानातले आणि मंगळसूत्रांनी आपला लूक पूर्ण केला. त्याचवेळी गौतमने स्काय ब्लू कलरचा कुर्ता-पायजामा घातला होता. त्याचबरोबर लग्नानंतर काजलने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवाचौथ उपवास देखील पाळला.काजल अग्रवालने तिच्या इंस्टाग्रामवर, लग्नातील वेगवेगळ्या सोहळ्यांचे चित्र पोस्ट केले.