दोन मुलं सांभाळता सांभाळता कंटाळली अभिनेत्री करीना कपूर, म्हणाली- सैफ रात्री उशिरापर्यंत…

करीना कपूर सध्या तिच्या व्यावसायिक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. नुकतीच ती पती सैफ अली खानसोबत एका जाहिरातीचे शूटिंग करताना दिसली होती. करीना आपल्या कामात व्यस्त असूनही दोन्ही मुलांच्या संगोपनाकडे विशेष लक्ष देत आहे. दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान करिनाने तिची दोन मुले तैमूर अली खान आणि जेह अली खान यांच्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

करीनाने सांगितले आहे की, दोन मुलांपैकी कोण जास्त अन्न पसरवतो आणि कोण जास्त शैतान आहे. तैमूर आणि जेहच्या जेवणाबद्दल बोलताना करीना कपूर म्हणाली की जेहने नुकतेच सॉलिड फूड खायला सुरुवात केली आहे आणि जेव्हाही तो जेवतो तेव्हा तो स्वतःच्या अंगावर अण्ण सांडवतो.

तैमूरच्या सवयींबद्दल करीना म्हणाली की- तो खूप सक्रिय आहे आणि तो एका जागी कधीच बसत नाही. तो नेहमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारत असतो. मी त्याला नेहमी सांगते की जरा शांत राहा…

करीना कपूरने सांगितले की, ती नेहमी तैमूरच्या झोपण्याच्या वेळेबद्दल चिंतेत असते. सैफच्या एका सवयीने ते त्रस्त आहेत. खरं तर, सैफची इच्छा आहे की तैमूरने रात्री उशिरापर्यंत जाग राहावं जेणेकरून तो त्याच्यासोबत वेळ घालवू शकेल. पण सकाळी ऑनलाइन शाळेमुळे मुलाने वेळेवर झोपावे असे तिला वाटते.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये करीना कपूरने तिचा दुसरा मुलगा जेहला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या लहान मुलाचे नाव आणि चेहरा उघड केला होता. जेह तिच्यासारखाच दिसतो, असे करीनाचे म्हणणे आहे. जेह देखील त्याचा मोठा भाऊ तैमूरसारखाच क्यूट आहे.

त्याच वेळी, जेहने मम्मीच्या आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढामध्ये काम केले आहे. वास्तविक, करिनाने सांगितले की, जेह या चित्रपटातील गाण्यात दिसणार आहे. तिने सांगितले होते की- माझा मुलगा प्रॅक्टिकली चित्रपटात आहे. तो आमिर आणि माझ्यासोबत एका रोमँटिक गाण्यात आहे.

तैमूरबद्दल बोलायचे झाले तर इतर मुलांप्रमाणे त्यालाही चॉकलेट, टॉफी, आईस्क्रीम खायला आवडते.आईस्क्रीम खाल्ल्यानंतरची त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

सैफने नुकतीच तैमूरबद्दल आपली इच्छा व्यक्त केली होती, त्याला आपल्या लाडक्या ला एक दिवस अभिनेता बनलेला बघायचे आहे. सैफ म्हणाला होता की- कोणत्याही एका शुक्रवारी तो त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित करेल, याची मला खात्री आहे. तैमूरने अभिनेता व्हावे अशी माझी इच्छा आहे.

त्याचवेळी आपल्या मुलाच्या प्रेमात वेडी झालेल्या करिनाने एकदा तैमूरसोबत अक्षय कुमारलाही आव्हान दिले होते. एका मुलाखतीत करिनाने अक्षयला सांगितले होते की, तैमूर येत्या काही दिवसांत तुमच्यासाठी मोठा धोका बनू शकतो. तो तुमच्या फॅन फॉलोइंगवरही मात करू शकतो.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर आमिर खानसोबत लालसिंह चड्ढा या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट एप्रिल 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी सैफ अली खानचा बंटी और बबली 2 हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याचवेळी तो आदिपुरुषमध्ये दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.