जेव्हा शाहरुख खानने मुकेश अंबानीच्या मुलाला विचारले आर्थिक उत्पन्न, एकूण झाला शाहरुख थक्क!!

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या कुटुंबामुळे बर्‍याचदा चर्चेत असतात. बॉलिवूडबरोबर अंबानी कुटुंबाचे नातेही खूप जुने आहे. बॉलिवूडचे अनेक स्टार्स नेहमीच अंबानी कुटुंबाच्या लग्नात किंवा विशेष सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. बॉलिवूडमधील अनेक कलाकारसुद्धा त्यांच्या फंक्शनमध्ये पोहोचून खूप मजा करतात. आज आम्ही तुम्हाला अंबानी कुटुंबाच्या उत्सवाशी संबंधित एक खास किस्सा सांगणार आहोत.

ही खास कहाणी 2017 सालची असून ती बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खानशी संबंधित आहे. रिलायन्सचे 40 वर्षे पूर्ण झाल्यावर अंबानी परिवाराने गुजरातमधील जामनगरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अनेक चित्रपटातील कलाकारांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे यजमान अभिनेता शाहरुख खान होते.

कार्यक्रमाचे होस्टिंग करताना शाहरुख खानने उपस्थित लोक आणि अंबानी कुटुंबातील मुलांसमवेत खूप मजाही केली. इतकेच नव्हे तर आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासमवेत त्यांनी मंचावर जोरदार नृत्यही केले. यावेळी, मुकेश अंबानीचा दुसरा मुलगा अनंत अंबानी यांनी शाहरुख खानशी असे काही बोलले,ज्या मुळे किंग खानने त्या च्या सोबत बोलणे बंद केले.

वास्तविक कार्यक्रमात शाहरुख खान अनंत अंबानीला त्याच्या पहिल्या पगाराबद्दल विचारात असतो आणि यानंतर शाहरुख खानचे बोलणे थांबते. शाहरुख खान अनंत अंबानीला सांगतो की त्याचा पहिला पगार 50 रुपये होता. पंकज उधास यांच्या संगीत मैफिलीत स्वयंसेवक होऊन त्यांनी ते पैसे मिळवले.

शाहरुख खानने आपल्या पहिल्या कमाईसह ताजमहालला भेट दिली असल्याचेही सांगितले. त्याचवेळी शाहरुख खानने अनंत अंबानीला त्याच्या पहिल्या पगाराबद्दल विचारले, ज्याला त्याने एक मजेदार उत्तर दिले आणि किंग खान ने त्याच्या सोबत बोलणे थांबवले. अनंत अंबानी यांनी शाहरुख खानला सांगितले की जर मी माझा पहिला पगार तुलासांगितला तर तुला लाज वाटेल. हे ऐकून शाहरुख गप्प बसला आणि कार्यक्रमातील उपस्थित लोक हसले.

Leave a Reply

Your email address will not be published.