बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो दरवर्षी 11 ऑक्टोबरला त्यांचा विवाह वर्धापन दिन साजरा करतात.तथापि या वेळेस तसे झाले नाही आणि दोघांनी 2020 मध्ये त्यांचे 54 वा वर्धापन दिन साजरा केला नाही.
दिलीप कुमारच्या ट्विटर अकाऊंटवरून सायराने ट्विट केले होते, ‘ 11 ऑक्टोबर हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे, दिलीप साहब यांनी या दिवशी माझ्याशी लग्न केले आणि माझे स्वप्न सत्यात उतरविले,परंतू या वर्षी वर्धापन दिन साजरा करनार नाही.
यानंतर दुसर्या ट्वीट मध्ये लिहिले की, ‘कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे बर्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे आणि बर्याच कुटुंबांना दु:ख दिले आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्ही सर्वांना आणि आमच्या प्रिय मित्रांना एकमेकांच्या सुरक्षिततेसाठी व आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करतो. देव आपल्या सर्वांबरोबर असो. सुरक्षित रहा’,आसे ट्वीट केले
दिलीप कुमारचे दोन भाऊ – एहसान आणि असलम खान यांना कोरोनाव्हायर ची लागन झाली होती. नंतर या दोन्ही भावांचा मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर सायरा बानो यांनी हा खुलासा केला होता की ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना भावाच्या निधनाबद्दल संगितले नव्हते.