भारतात अब्जाधीशांची कमतरता नाही. सध्या आपल्या देशात शंभराहून अधिक अब्जाधीश आहेत आणि दरवर्षी ही संख्या वाढत आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला या अब्जाधीशांबद्दल सांगत नाही तर त्यांच्या सुंदर आणि दर्जेदार मुलींबद्दल सांगत आहोत. ज्या आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जगभरात नाव कमावलेे आहे आणि कोट्यावधींच्या मालक आहेत.
ईशा अंबानी:
ईशा अंबानी ही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी ची मुलगी आहे. तिच्या वडिलांप्रमाणेच ईशा एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. ईशाने अगदी थोड्या वेळातच हे स्थान मिळवले आहे. 2015 मध्ये, ईशा अवघ्या 16 वर्षांची होती जेव्हा फोर्ब्सने यंगनेस्ट बिलियनेअर बिझनेस वूमनच्या यादीत तिने दुसरे स्थान मिळवलेे होते. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ईशा अंबानीची सुमारे 800 800 लाखांची हिस्सेदारी आहे.
वनिषा मित्तल:
वनिषा मित्तल 38 वर्षांची असून ती यशस्वी व्यावसायिक महिला मानली जाते. ती स्टील किंग लक्ष्मी मित्तल ची मुलगी आहे आणि तीने लंडनमधील बिझिनेस स्कूलमधून मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. अभ्यासानंतर तीने स्वत: चा कौटुंबिक व्यवसाय उचलला. वनिशाने 2004 मध्ये पॅरिसमध्ये अमित भाटियाशी लग्न केले होते आणि लक्ष्मी मित्तल ने आपल्या मुलीच्या लग्नासाठी 514 कोटी रुपये खर्च केले होते..
राधा कपूर:
राधा कपूर येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर ची मुलगी आहे. येस बँक ही भारतातील चौथी मोठी खासगी बँक आहे. राधाचा स्वत: चा व्यवसाय असून ती त्यामधे कोट्यावधी पैसे कमवते. प्रो कबड्डीमध्ये तीच्याकडे दिल्लीची दबंग टीम आहे. राधाचे लग्न दिल्लीतील व्यापारी रवी खन्नाचा मुलगा आदित्य खन्ना याच्याशी झाले आहे.
निशा गोदरेज:
निशा गोदरेज (गोदरेज ग्रुप) या कंपनीची कार्यकारी संचालक आणि प्रसिद्ध भारतीय व्यापारी आदि गोदरेज ची मुलगी आहे. 41 वर्षीय निशाने हार्वर्डमधून एमबीए केले आहे. निशा मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजकल्याण कार्यक्रमातही भाग घेते. निशाच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 5.2 अब्ज आहे.
रोशनी नादर:
रोशनी (वय 37) ही भारतीय अब्जाधीश शिव नादरची मुलगी आहे. ती एका मोठ्या आयटी कंपनी एचसीएल ग्रुपचे सीईओ आहे आणि वयाच्या 27 व्या वर्षी ती एचसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाली. 2017 मध्ये तिला जगातील सर्वात शक्तिशाली 100 महिलांच्या यादीमध्ये प्रसिद्ध फोर्ब्स या प्रसिद्ध मासिकाने समाविष्ट केले.
मानसी किर्लोस्करः
मानसी किर्लोस्कर सिस्टममध्ये ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ती विक्रम आणि गीतांजली किर्लोस्कर यांची मुलगी आहे. मानसीला प्रवासाची खूप आवड आहे आणि म्हणूनच ती बर्याचदा चर्चेत असते. ती टोयोटा किर्लोस्कर साम्राज्याची एकमेव मालक आहे. वर्ष 2018 मध्ये, टिकाऊ विकास लक्ष्यांसाठी मानसीची भारतातील पहिली यूएन यूथ बिझिनेस चॅम्पियन म्हणून नियुक्ती झाली.
अनन्या बिर्ला:
अनन्या आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्लाची मुलगी आहे आणि आता फॅशन आणि गायन या व्यवसायातही स्वत: साठी नाव कमावत आहे. अनन्या लक्झरी प्रॉडक्ट्स ई-कॉमर्स कंपनी कुरोकार्टची संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहे.