अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 25 जानेवारी 1991 रोजी रिलीज झालेल्या सौगंध या चित्रपटाने त्याने ईडस्ट्रीत प्रवेश केला होता. तथापि, त्याचा पहिलाच चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. असे असूनही त्याने स्वतः च्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावले.
आज त्याच नावं अशा लिस्टमध्ये आहे की जे चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सर्वाधिक फीस घेतात. तसेच पहिल्या चित्रपटात शांतीप्रिया ने अक्षयसोबत काम केले होते. यामुळे तिला पहिली नायिका म्हटले जाते. अक्षयने शांतीप्रिया पेक्षा जास्त नाव कमावले आहे. तसेच 51 वर्षीय शांतीप्रिया आता ओळखणेही खूप कठीण झाले आहे.
जेव्हा अक्षयने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अजय देवगन हेदेखील आपले नशीब आजमावत होते. 1992 मधील अब्बास-मस्तानची सस्पेन्स-थ्रिलर फिल्म ‘खिलाडी’ हा अक्षयचा पहिला हिट चित्रपट होता. या चित्रपटाने त्याला बॉलिवूडमधील खेळाडूची पदवी दिली. या मालिकेचा शेवटचा चित्रपट ‘खिलाडी 786′ आहे.
शांतीप्रियाबद्दल बोलायचे झाले तर वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी ती विधवा झाली होती. शांतिप्रियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावर्षी तिने अभिनेता सिद्धार्थ रे याच्याशी 1999 साली लग्न केले होते.सिद्धार्थने वंश आणि बाजीगर यासारख्या चित्रपटात देखील काम केले होते. तथापि, 2004 मध्ये, 40 वर्षीय सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. शांतीप्रिया आणि सिद्धार्थ यांना दोन मुले आहेत.
शांतीप्रिया चा पती सिद्धार्थ रे हे व्ही. शांताराम यांचा नातू होता. 1992 साली त्यानी वंश या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तो टिळक आणि मिलेेट्रीराज सारख्या बर्याच चित्रपटांत दिसला होता. सिद्धार्थ बहुतेक बाजीगर या चित्रपटातील भक्कम भूमिकेसाठी ओळखला जातो. यात त्यानी काजोलचा मित्र आणि इन्स्पेक्टर करण सक्सेनाची भूमिका साकारली होती. त्यांच्यावर चित्रित केलेले’ छुपाना भी नहीं आता’ हे गाणे खूब पॉपुलर’ झाले होते.
शांतीप्रियाचा पहिला हिंदी चित्रपट ‘सौगंध’ फ्लॉप झाला होता, परंतु तीला बॉलिवूडमध्ये काम मिळत राहिल. यापूर्वी ती तामिळ, कन्नड आणि तेलगू चित्रपटांमध्ये सक्रिय होती. विशेष म्हणजे सौगंधची फ्लॉप असूनही शांतीप्रियाला फूल और अंगार (1993), वीरता (1993) इक्के पे इक्का (1994) असे अनेक चित्रपट मिळाले होते.
आपल्या पतीच्या निधनानंतर शांतीप्रिया पुन्हा चित्रपटात परतली होती. यावेळी ती तिचा माजी सहकारी अभिनेत्री मिथुनचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती च्या हॅमिल्टन पॅलेस या चित्रपटात दिसली आणि हा चित्रपट फ्लॉप झाला.