एकदम गावरान वाटणारी आर्ची दिवसेंदिवस होत चाललीये आणखीनच बोल्ड, पुन्हा शेअर केला बोल्ड फोटो

सैराट चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

नूकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला रिंकूचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. रिंकूचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.रिंकूचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिने हा फोटो शेअर करून केवळ एक तास झाले आहे.

एका तासांत १२ हजाराहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. तू खूपच छान दिसत आहेस असे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. पण रिंकूने हा फोटो लगेचच डीलिट देखील केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेकवेळा रिंकू फोटो अपलोड केल्यानंतर काहीच तासांत ते डीलीट करत आहे.

काही दिवसांपूर्वी देखील रिंकूने तिचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. रिंकूचा लूक गेल्या काही महिन्यात चांगलाच बदलला असून तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ती गेल्या काही महिन्यात अधिक ग्लॅमरस झाली आहे. रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा ॲमेझॉन प्राइमवर अनपॉज्ड हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये रिंकू दिसली होती. या शिवाय रिंकू राजगुरूने नुकतेच लंडनमध्ये आगामी मराठी चित्रपट छूमंतरचे शूटिंग पूर्ण केले आहे.

छूमंतर चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती. याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.