अभिनेत्री अनुष्का शर्मा आजकाल मदरहुड एंजॉय घेत आहे. तिने चित्रपटांपासून ब्रेक घेतला आहे आणि मुलगी वामिकाबरोबर वेळ घालवत आहे. अनुष्काला मुलगी वामिका आणि पती विराटसमवेत विमानतळावर स्पॉट केले होते. अनुष्का विराटसमवेत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडला गेली आहे. अनुष्कानेे विमानतळावर मुलगी वामिकाला आपल्या मिठीत घेतलेेली दिसली होती. अभिनेत्रीने मुलगी पूर्णपणे कवर होती.
या दरम्यान अनुष्का ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. अनुष्काने हाय पोनी केली होती. तसेच एक बॅगही तिनेे कॅरी केली होती. तसेच विराटनेेही ब्लॅक जॅकेट परिधान केले होते. वर्क फ्रंटवर, अनुष्का शर्मा शेवटच्या वेळी झिरो चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात शाहरुख खान आणि कटरीना कैफ यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय ने केली होती.
सध्या ती फिल्म-वेब शोची निर्मिती करीत आहे. ती इरफान खानचा मुलगा बाबीलच्या डेब्यू फिल्म ‘Qala’ ची निर्माता आहे. ही नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. याशिवाय अनुष्काने पाताल लोक नावाची बेब सीरिज केली. तसेच ती चाहत्यांनी चांगलीच पसंत केली.
चाहत्यांना तीचा बुलबुल हा चित्रपटही खूप आवडला. मुलगी वामिकाबद्दल सांगायचे तर यावर्षी जानेवारीत अनुष्काने वामिकाला जन्म दिला. अभिनेत्रीने वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. आतापर्यंत फक्त एक फोटो शेअर केला गेला आहे, ज्यामध्ये वामिकाचा चेहरा दिसू शकत नाही.