चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचे पूर्ण नाव कदाचित तुम्हाला माहित असेल.पण या यादीमध्ये, अनेक जुन्या आणि अद्ययावत स्टार्सची नावे समाविष्ट आहेत. केवळ अभिनेतेच नव्हे तर बर्याच अभिनेत्रींनीही त्यांंचे पूर्ण नाव लपविल आहे.
90 च्या दशकात बॉलीवूडची सर्वात जास्त चाहती असलेली अभिनेत्री काजोलचे लग्न अजय देवगनशी झाले असून, तिचे नाव काजोल देवगन आहे. पण याआधी काजोलला फक्त काजोल याच नावाने ओळखले जात असे. काजोलचे खरे पूर्ण नाव काजोल मुखर्जी असे होते. पण तिचे पालक विभक्त झाल्यानंतर तीने आपल्या नावापुढे आडनाव लावणे बंद केले.
बॉलिवूडचा 70 आणि 80 च्या दशकाचा देखणा अभिनेता धर्मेंद्रही बर्याचदा त्याच्या नावाने ओळखला जातो. त्याचे पूर्ण नाव कधीच घेतले जात नाही. धर्मेंद्रचे पूर्ण नाव धर्मेंद्रसिंग देओल आहे.
बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा प्रत्येक शोमध्ये दिसते. रेखा देखील सुरुवातीपासूनच तिच्या नावाने परिचित आहे. रेखा कधीही आडनाव वापरत नाही. रेखाचे खरे नाव भानुरेखा गणेशन होते.
बॉलिवूडचा नवा सुपरस्टार रणवीर सिंगनेही आपले नाव बदलले आहे. रणवीर सिंगचे खरे नाव रणवीर सिंह भवानी आहे. पण बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्याने आपल्या पूर्वजांचे टाइटल काढून टाकले.
दक्षिनची आणखी एक अभिनेत्री आहे जिने तिचे नाव बदलले आहे. ही अभिनेत्री तिचे आडनाव वापरतना कधीही दिसत नाही. अभिनेत्री असिनचे खरे नाव थोट्मकल आहे.
अखेर श्रीदेवी हे नाव कोणाला माहित नाही. श्रीदेवी ही बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्री होती. श्रीदेवीचे खरे नाव श्रीअम्मा यांगर अयप्पन होते.
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनेही आपले नाव बदलले आहे. या बॉलीवूड सुपरस्टारचे खरे नाव राजीव भाटिया आहे.
अभिनेत्री तब्बू देखील कित्येक दशकांपासून मनोरंजन करीत आहे. तिने आजपर्यंत लग्न केलेले नाही, तिचे पूर्ण नाव तबब्सुम हाश्मी होते आणि ते बोलायला फारच लांब होते.
बॉलिवूडचा किंग गोविंदा हे नाव सर्वांना माहित आहे. पण अरुण आहूजा असे गोविंदाचे पूर्ण नाव आहे. पण इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्याने आपले नाव गोविंदा ठेवले होते.
80 आणि 90 च्या दशकात खूप प्रसिद्ध असलेल्या अभिनेता जितेंद्रचेही एक वेगळे नाव आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्यानेही आपले नाव बदलले होते. यापूर्वी जितेंद्रचे खरे नाव रवी कपूर होते.