आपल्या 12 वर्ष मोठ्या प्रियसीच्या शेजारीच घेतला अर्जुन कपूरने बंगला!!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने मुंबईच्या वांद्रे भागात नवीन घर विकत घेतले आहे. खास गोष्ट म्हणजे अर्जुनने ज्या ठिकाणी घर घेतले आहे, ते ठिकाण त्याच्या लेडी लव मलाइका अरोड़ाच्या सोसायटी जवळच आहे.

अर्जुनने बांद्रा वेस्ट या भागात सी-फेसिंग असलेले 4 बीएचके अपार्टमेंट खरेदी केले आहे. ही एक 26 मजली इमारत आहे जिथून वर्ली सी लिंकचे दृश्य जबरदस्त दिसतेे. या आपार्टमेंटची किंमत सुमारे 20 ते 23 कोटी आहे.

अर्जुनच्या व्हिलामध्ये या सुविधा आहेत…
अर्जुनच्या व्हिलामध्ये पूल, जिम, pet कॉर्नर, लाइब्रेरी, प्‍ले एरिया, मिनी गोल्‍फ कोर्स, स्‍पा अशा अनेक सुविधा आहेत. या वर्षाच्या सुरूवातीस आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, जान्हवी कपूर, अमिताभ बच्चन या सेलिब्रिटींनीही नवीन घर विकत घेतले आहे.

या चित्रपटांमध्ये अर्जुन दिसणार आहे…
व्यावसायिक आघाडीविषयी बोलताना अर्जुन ‘संदीप और पिंकी फरार’ आणि ‘सरदार का ग्रैंडसन’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. आता तो ‘भूत पोलिस’ आणि ‘ एक विलन 2 मध्ये दिसणार आहे. या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.