या मराठी हास्यसाम्राटवर कोसळला दुःखाचा डोंगर, कोरोनाने घेतला पत्नीचा ब’ळी!!

प्रख्यात मराठी अभिनेता भूषण कडू याच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान कादंबरी कडू यांची प्राणज्योत मालवली. कडू कुटुंबीयांसाठी हा मोठा आघात आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेल्या भूषण कडूसोबत त्याच्या कुटुंबाची ओळखही प्रेक्षकांना झाली होती. भूषणला प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे.

करोनाचं निदान झाल्यानंतर कादंबरी यांना सुरुवातीला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृती खालावल्यामुळं त्यांना केईएममध्ये हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. भूषण कडू यांना सात वर्षांचा मुलगा आहे. कादंबरीच्या निधनामुळं कडू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी या रिअॅलिटीच्या पहिल्या सिजनमध्येही भूषणने हजेरी लावली होती. फॅमिली स्पेशल एपिसोडच्या निमित्ताने भूषणची पत्नी कादंबरी आणि मुलाने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती. यावेळी बऱ्याच दिवसांनी आपल्या मुलाला पाहताना भूषणच्या अश्रूंचा बांध फुटला होता. बाप-लेकाच्या नात्याची वीण पाहून स्पर्धक आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या होत्या.

छोट्या पडद्यावरील ‘कॉमेडी एक्प्रेस’मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले भूषण कडू हे त्यांच्या विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी ओळखले जातात. भूषण कडू हे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातही सहभागी झाले होते. त्यातील फॅमिली स्पेशल भागाच्या निमित्तानं भूषण यांच्यासोबत पत्नी कादंबरी व मुलगा प्रकीर्त हे देखील बिग बॉसच्या घरात दिसले होते. कादंबरी यांच्या निधनाबद्दल मराठी मनोरंजनसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.