अभिनेत्री शिल्पा शेट्टी कदाचित आजकाल चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी तिच्या जीवनशैलीवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. शिल्पाने बिझनेसमॅन राज कुंद्राशी लग्न केले आहे आणि ती खूप विलासी जीवन जगते. तिच्या घराबद्दल बाब असो वा प्रवासाबद्दल, ही अभिनेत्री सर्वत्र आयुष्यापेक्षा मोठ आयुष्य जगते.
शिल्पा शेट्टी चे स्वतःचे खासगी जेटदेखील आहे. आज, या खासगी विमानातले इन साईड फोटो पाहूूया… या खासगी विमानाच्या आतील भाग अतिशय विलासी आहे. एका प्रकारे ते स्टुडिओ अपार्टमेंटसारखा दिसतो. बर्याचदा शिल्पा शेट्टी या जेटबरोबर आपले फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असते.
या खासगी जेटमध्ये तपकिरी रंगाचे फर्निचर आहे. त्याच्या आत एक ड्रॉवर देखील आहे, जेेे की सामान ठेवण्यासाठी बनवलेलं आहे. या खासगी विमानात एक अतिशय आरामदायक बसण्याची व्यवस्था आहे. यामध्ये जो प्रवास करेल त्याची करमणूक आणि भोजनाची खूप चांगली व्यवस्था आहे, जे आपण या चित्रात देखील पाहू शकता.
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या खासगी विमानात आपल्या परिवारासह प्रवास करतात. शिल्पाने एकदा सांगितले होते की कोविड टाळण्यासाठी तिचे कुटुंबही याचा वापर करते जेणेकरून गर्दी पासुन बचाव होतो. कामाबद्दल बोलतांना शिल्पा शेट्टी रियलिटी शो जज करते, आणि हंगामा 2 या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे. शिल्पाला, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.