जया प्रदाने का केले तीन मुलांच्या बापासोबत जयाप्रदा लग्न,हे होते धक्कादायक करण!!

जयाप्रदा यांचे खरे नाव ललिता राणी आहे. त्यांचा जन्म आंध्रा प्रदेशात राजमंड्री मध्ये झाला होता. त्यांचे वडील कृष्णा राव हे तेलगू चित्रपटाचे फायनान्सर होते. जया यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात तेलगू चित्रपट ‘ भूमिकोसम ‘ ने झाली होती. या चित्रपटासाठी त्यांना फक्त 10 रुपये मिळाले होते.

जयाप्रदा ने सन 1979 मध्ये चित्रपट ‘ सरगम ‘ मधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. चित्रपट हिट राहिला मात्र यामुळे जयाप्रदा यांना काही खास ओळख मिळाली नाही. जयाप्रदा यांनी निर्माता श्रीकांत नाहटा यांच्यासोबत 22 जून 1986 मध्ये लग्न केले. जयाप्रदा ही श्रीकांत यांची दुसरी पत्नी होती. श्रीकांत आणि जयाप्रदा यांच्या लग्नामुळे खूप वाद देखील निर्माण झाला होता.

श्रीकांत आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचे तीन मुले होते. त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता जयाप्रदा यांच्यासोबत लग्न केले होते. महान चित्रपट निर्माते सत्यजीत रे जयाप्रदा यांची सुंदरता व अभिनयाने एवढे प्रभावित झाले होते की ते जयाप्रदा यांना जगातील सुंदर महिलांपैकी एक मानत होते.

जयाप्रदा यांच्या कारकिर्दीत एक काळ असा आला की त्या चार वर्षात हिंदी चित्रपट सृष्टीच्या राणी झाल्या. सन 1984-1988 पर्यंत त्यांचे नाव टॉप अभिनेत्रींच्या यादीत होते. चित्रपटांव्यतिरिक्त जयाप्रदा ह्या राजनीती मध्ये देखील खूप लोकप्रिय आहेत. जयाप्रदा ने सन 1994 मध्ये त्यांचे आधीचे सोबतचे अभिनेता एन. टी. रामाराव यांनी तेलगु- देशम पक्षात सामील केले.

Leave a Reply

Your email address will not be published.