टीव्ही जगाने अशा अनेक मालिका दिल्या ज्यांमुळे प्रेक्षकांमधे तीव्र छाप पडली गेली. अशाही काही सीरियल आहेत ज्या संपल्यानंतरही मनातून संपत नाहीत. तसेच या मालिकांपैकी एक सीरियल आहे ती म्हणजे पवित्र रिश्ता,, मानव आणि अर्चनाला पवित्र रिश्ता या मालिकेतून घरा-घरात स्थान मिळाले. अलीकडेच अंकिताने सुशांतबद्दल एक मुलाखत दिली ज्यामध्ये तिने सांगितले की सुशांत हा तीचा फेवरेट को स्टार होता.
माध्यमांशी बोलताना अंकिताला विचारले गेले की कोणत्या नायकाबरोबर तिला सर्वात जास्त काम करण्यास आवडते. तर यावर उत्तर देताना अंकिता म्हणाली, माझ्यानुसार सुशांत, कारण आम्ही खुप वेळा एकत्र कामे केली आहेत. अंकिताच्या म्हणण्यानुसार, पवित्र रिश्ता, शो हा करियरचा टर्निंग पॉईंट होता. विशेष म्हणजे सुशांत आपल्या बॉलिवूड कारकिर्दीच्या सुरूवातीपूर्वी या शोमध्ये काम करायचा.
यासोबतच अंकिताने रिलेशनशिपबद्दलदेखील चर्चा केली. जेव्हा तिला विचारले गेले की कोणत्याही नात्यात तिला काय आवडत व काय आवडत नाही. अंकिताच्या म्हणण्यानुसार, माझ्या जवळ असलेला कोणताही माणूस माझ्याबद्दल काहीही विचार करो, मी त्याला आवडत असो किंवा नसो, पण फक्त माझ्याशी प्रामाणिक रहा. अंकिताच्या म्हणण्यानुसार, ती जवळच्यां माणसाविशई खूप सकारात्मक आहेत, जर कोणी माझ्यावर खोटे बोलले तर मी त्याची चौकशी करते.
तसेच अंकिता लोखंडेने मुलाखतीत प्रियकर विक्की जैन याच्याशी तिच्या लग्नाची पुष्टी केली आणि म्हटले आहे की, “विवाह कोणत्याही मुलीसाठी एक सुंदर भावना असते. मी माझ्या लग्नाबद्दलसुद्धा खूप उत्सुक आहे. मला आशा आहे की तो दिवस लवकरच येत आहे. मी लवकरच लग्न करणार आहे. माझे लग्न जयपूर किंवा जोधपूरमध्ये होईल. आतापर्यंत कोणतेही नियोजन नसले तरी मी राजस्थानी स्टाईलमध्ये लग्न करनार आहे. ‘
अंकिताला जेव्हा विचारले गेले की अशी कोणती गोष्ट आहे जी ति स्वतःमध्ये बदलू इच्छित आहे. यावर अंकिताने उत्तर दिले की, मी नेहमीच भावनिक राहू नये अशी तीची इच्छा आहे. अंकिताच्या म्हणण्यानुसार अशा अनेक प्रसंग उद्भवतात जेव्हा आपल्या मनाला बाजूला ठेवून विचार करावा लागतो. अंकिताच्या म्हणण्यानुसार ती कधीच ही गोष्ट करू शकली नाही, परंतु आता तिला मन बाजूला ठेवून विचार करण्याची इच्छा आहे.