तिच्या शैलीच्या बळावर, रेखा आजही तिच्या काळात जशी लोकांच्या मनावर राज्य करायची तशी ती आजही करते. त्या दिवसांत रेखा केवळ तिच्या अभिनयामुळेच नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रसिद्धीच्या झोतात होती. रेखा स्पष्टपने बोलनारी अभिनेेेत्री होती आणि ज्यामुळे तिच्या बोलण्यावर टीकाही होत असत. याशिवाय रेखा तीच््या आफेअर्सबाबतही बरीच प्रसिद्धीत होती.
या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत परंतु आज आम्ही आपल्याला त्या गोष्टी सांगणार आहोत ज्या माहित नाहीत. वास्तविक, बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांव्यतिरिक्त, क्रॉस-बॉर्डर क्रिकेटरचे हृदयही रेखासाठी धडधडत होते. हा क्रिकेटपटू इतर कोणी नसून सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आहेत. त्या दिवसांत या दोघांच्या प्रेमाची चर्चा सामान्य होती, तसेच हे दोघे लवकरच एकमेकांशी लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे.
वास्तविक या सर्व बाबी एका न्यूज पेपरच्या कटिंगमुळे उघडकीस आल्या, हा कटिंग आणि त्यात प्रसिद्ध केलेला लेख सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सर्व प्रकारचे दावे या लेखातच लिहिले गेले आहेत. तथापि, या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे याची खात्री नाही. जर या लेख वृत्तपत्रावर विश्वास ठेवला, तर रेखा आणि इम्रान खान हे लवकरच सेटल होणार आहेत.
त्याचवेळी अभिनेत्रीची आई इम्रान खान आणि रेखा यांच्या जोडीला खूप पसंत करते, आणि तिने त्यांना मान्यताही दिली आहे. इतकेच नाही तर रेखाच्या आईचीही हे लग्न लवकरात लवकर व्हावे अशी इच्छा होती. यासाठी तीने इम्रान खान आणि रेखा यांच्या कुंडलीही जोतिषकडून पहिली होती. तसेच रेखा आणि इम्रान खान मुंबईच्या बीच वर बर्याच वेळा पाहिले गेले होते.
तसेच असा दावा केला जात आहे की, रेखाखेरीज इम्रान खानचे शबाना आझमी आणि झीनत अमान यासारख्या अभिनेत्रींशीही संबंध होते. त्याचे एक विधानही या लेखात छापले गेले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रींबद्दल बोलताना तो म्हणाला होता की”अभिनेत्रीबरोबर वेळ घालवणे ठीक आहे.” मी त्यांचा थोडा काळ आनंद घेतो, परंतु मी कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही. “