मलायका अरोराने 12 वर्ष छोट्या प्रयकरची पाठ राखत ट्रोलर्सला दिले कडक प्रत्युत्तर!!

अरबाज खानबरोबर घ’टस्फो’ट झाल्यापासून मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या संबंधांमुळे चर्चेत आहे. मलायका अरोरा 47 वर्षांची आहे, तर अर्जुन कपूर 35 वर्षांचा आहे, त्यामुळे या दोघांच्या नात्यात 12 वर्षांचा फरक आहे.

मलायका अरोरा अनेकदा वयोगटातील या अंतरांबद्दल ट्रोल होत असते. परंतु या दोघांनी या गोष्टींबद्दल कधीही पर्वा केली नाही. आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी ट्रोलर्सची बोलतीही बंद केली.

मलायका एकदा एका मुलाखतीत यावर उघडपणे बोलली होती की, जेव्हा वयाने मोठी असलेली मुलगी एखाद्या मुलाला डेट करते, तेव्हा बहुतेकदा तिला बुडी म्हणतात, पण प्रेमात फक्त भावना महत्त्वाच्या असतात.इतकेच नाही तर मलायका ने असेही स्पष्टपणे म्हटले होते की, ती अशा गोष्टींना प्राधान्य दित नाही.

मलायकाचा 2017 मध्ये घ’टस्फो’ट झाला आणि त्यानंतर लवकरच तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण नंतर दोघांनीही आपोआपच या नात्याची पुष्टी केली.

आज ते दोघेही मोकळेपणाने राहतात, एकमेकांना मोकळेपणाने भेटतात, एकमेकांच्या घरातील पार्ट्यांमध्ये हजेरी लावतात आणि ते एकमेकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भागही बनले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.