90 च्या दशकाची सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट सुपरहिट अभिनेत्री आहे. मात्र, आता तिचे नाव वादात अडकू लागले आहे. पण एक काळ असा होता की हिंदी सिनेमा जगातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत पूजाचे नाव घेण्यात येत होते. पूजाचे चित्रपट प्रेक्षकांना आवडत होते आणि आता ही अभिनेत्री लवकरच ओटीटीवर डेब्यू करण्याची तयारी करत आहे.
पूजा नेटफ्लिक्स शो ‘बॉम्बे बेगम’ या प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. पूजाचे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. पूजाला पुन्हा पाहायला प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. दरम्यान, पूजा भट्टने एक मुलाखत दिली आहे ज्यात तिने काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कदाचित लोकांना आतापर्यंत माहित नव्हत्या.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट ची मोठी मुलगी आणि आलियाची मोठी बहीण पूजाने वयाच्या 17 व्या वर्षी ‘डॅडी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर पूजा तिच्या कारकीर्दीतील हिट चित्रपट ‘सडक’ मध्ये दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचे वडील महेश भट्ट ने केले होते आणि चित्रपटामद्ये पूजाच्या कारकीर्दीचा पहिला किसिंग सीनदेखील केला होता. ज्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती.
खरं तर पूजाने लहान वयातच पदार्पण केले आणि अशा परिस्थितीत किस घेणारा सीन समोर येताच ती खूप अस्वस्थ झाली होती. या चित्रपटात पूजाच्या विरुद्ध संजय दत्त होता. चिंताग्रस्त पूजाने तिच्या वडिलांशी किसिंग सीनबद्दल विचारले होते. आणि ति आजपर्यंत वडीलांनी दिलेली शिकवण फॉलो करते. पूजा तिच्या मुलाखतीत म्हणाली की, ‘बर्याच वर्षांपूर्वी मला’ सड़क ‘च्या सेटवर एक गोष्ट शिकायला मिळाली होती. जेव्हा मला माझा आयकॉन संजय दत्तला किस करायचे होते. त्यावेळी मी 17-18 वर्षांची असेल.
त्यावेळी माझ्या वडिलांनी म्हटले होते की, जर पूजा तुला वल्गर वाटत असेल तर ते वल्गरच असेल. म्हणून तुला किसिंग आणि लव मेकिंग सीन निर्दोषपणाने आणि ग्रेसफुल्ल द्यावी लागतील कारण सीन कम्युनिकेट होने फार आवश्यक आहे ‘. वडिलांच्या या शिकवनीनंतर पूजाने किसिंग सीन दिला आणि हा चित्रपट तिच्या कारकिर्दीचा सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला.
वडिलांचा कीस,तसे, पूजा भट्ट चे नावही बर्याच वादाशी संबंधित आहे. पूजा भट्ट आणि तिचे वडील महेश भट्ट यांनी चित्रपटाच्या मासिकासाठी फोटोशूट केले होते तेव्हा संपूर्ण इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. या फोटोशूटमध्ये वडील आणि मुलगी एकमेकांचे किस घेताना दिसले. हे फोटोशूट समोर येताच बर्यापैकी गोंधळ उडाला होता.