बॉलिवूड हँडसम आणि स्टायलिश अभिनेता शाहिद कपूर चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखिल बराच चर्चेत आहे. शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर आणि त्याची मुले मीशा आणि जैन यांची छायाचित्रे बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. कन्या मीशाच्या जन्मानंतर शाहिद कपूरने आपल्या पालकांची क्षमा मागितली.याचा खुलासा त्यानी स्वतः केला.
एका मुलाखतीत शाहिद कपूरने सांगितले होते की मीरा राजपूतशी लग्न करूनही तो स्वत: मध्येच हरवला होता. पण मुलीच्या जन्मानंतर तो बराच बदलला. वडील झाल्यावर समजले की तो स्वार्थी झाला आहे. शाहिद कपूरने सांगितले की आता तो आपल्या पालकांचा नेहमीपेक्षा जास्त आदर करतो. कारण कुटुंबाने त्याच्यासाठी काय केले हे त्याला समजले आहे.शाहिद म्हणाला की, वडील झाल्यानंतर त्यानी आपल्या सर्व कृत्यांबद्दल पालकांकडून क्षमा मागितली.
पूर्वी मीरा राजपूतने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये मीरा राजपूतने लॉकडाऊन दरम्यान मुलांना कसे व्यस्त ठेवले ते सांगितले. यावर भाष्य करताना शाहिद कपूर नी मीरासाठी लिहिले की, “तु दोन मुलांची आई वाटत नाही म्हणून कोणी तुला गंभीरपणे घेत नाही.”