बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक बड्या नावांपैकी एक म्हणजे सनी देओल. तो त्याच्या काळातील महान अॅक्शन हिरो होता. लोक त्याच्या चित्रपटांसाठी लांब लाईन मद्ये उभे राहून तिकीटे घेत असत. सनीच्या काळात फक्त सनी अॅक्शनमध्ये चालायचा. सनीच्या अॅक्शनची सर्वात खास बाब म्हणजे त्याचे डायलॉग.असे डायलॉग की जे अजूनही लोकाच्या लक्षात आहेत.
बेताब’ हा चित्रपट सनीचा डेब्यू फिल्म होता. रिलीज होताच, तो रातोरात सुपरस्टार झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अमृता सिंग देखील होती. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. यानंतर या दोघांनीही बर्याच चित्रपटांमध्ये काम केले. आणि यादरम्यान या दोघांमधील प्रेम वाढू लागले. दोघांचे संबंध लग्नापर्यंत पोहोचले होते. पण आमृता ला समजले की सनी परदेशात पूजा नावाच्या मुलीशी रिलेशनमध्ये आहे.
रवीना टंडन
सनी देओल चे नाव रवीना टंडनशीही जोडले गेले आहे. रवीना टंडन आणि सनी देओल अनेक चित्रपटात एकत्र दिसले आहेत. जिद्दी आणि क्षेत्रीय चित्रपटाच्या दरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते. व दोघेही प्रेमात पडले. नंतर रवीना टंडन देखील सनीपासून विभक्त झाली, कारण सनी आधीच विवाहित होता.
डिंपल कपाडियनची एन्ट्री
डिम्पल कपाडियनबरोबर सनीची प्रेमकथा बर्याच दिवस चालली. या नात्यामुळे सनीच्या घरातही आग लागली होती. डिंपल कपाडियनबरोबर स्वतः सनी देओलही बर्यापैकी गंभीर होता. डिंपल कपाडिया यावेळी पती राजेश खन्नापासुन वेगळी राहत होती. लग्नानंतरही सनी देओल या नात्याबद्दल गंभीर होता. डिंपलची मुलगी ट्विंकल खन्ना सनीला छोटा पापा म्हणायची. डिंपल आणि सनीचे संबंध 11 वर्षे टिकले.
मीनाक्षी शेषाद्री
मीनाक्षी शेषाद्री त्या काळातली सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असायची. मीनाक्षी शेषाद्रि नेही सनीला डेट केले आहे. या दोघांनाही चित्रपटात लोकांनी खूप पसंत केले आहे. त्यांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यांचे संबंधही फार काळ टिकले नाहीत.