अगदी एकमेकींच्या कार्बन कॉपी दिसतात या बॉलिवूड च्या प्रसिद्ध अभिनेत्री!!

हिंदी चित्रपटसृष्टीतील सौंदर्य, नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित 54 वर्षांची झाली आहे. माधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबई येथे झाला होता. माधुरी दीक्षित गेली 37 वर्ष चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. तिच्या प्रदीर्घ चित्रपट कारकीर्दीत माधुरीने अनेक प्रकारची पात्रे साकारली आहेत.

फरहीन…
अभिनेत्री फरहीनने ज्येष्ठ अभिनेता अक्षय कुमारसोबत काम केले आहे. अक्षय कुमारच्या ‘सैनिक’ या चित्रपटात फरहीनने ‘खिलाडी कुमार’ ची बहिण ही भूमिका साकारली होती. माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकरशी लग्नानंतर फराहिनने फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला. फरहीनही मधुरीसारखीच दिसते. तसेच तिला 90 च्या दशकात बरीच प्रसिद्धी मिळाली आहे.

अश्विनी भावे…
अश्विनी भावे बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. अश्विनी भावे ने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘हिना’ या चित्रपटाने केली होती. अश्विनीचा चेहरा देखील माधुरी दीक्षितशी मोठ्या प्रमाणात जुळतो. तसेच, त्या दोघांचेही स्मित पूर्णपणे एकसारखे दिसते. अश्विनी भावे आता अमेरिकेत राहते. लग्नानंतर ती आपल्या पतीसमवेत परदेशात स्थायिक झाली आहे.

अंतरा माळी…
एक काळ असा होता की, अंतरा माली माधुरी दीक्षितमुळे चर्चेत आली होती. बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसलेल्या अंतरा मालीचे बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षित होण्याचे स्वप्न होते आणि तिने ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं’ या चित्रपटात काम केले होते. 2003 साली हा चित्रपट आला होता, परंतु तिला यश मिळाले नाही. माधुरी दीक्षितशी तिचे साम्य असल्यामुळे ती अधिक चर्चेत राहिली आहे.

लवलीन…
माधुरी दीक्षितच्या कार्बन कॉपी या यादीमध्ये लवलीनचे नाव समाविष्ट आहे. लावलिन खूपच बोल्ड आणि हॉट दिसते. लवलीनने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर ती बर्‍याच जाहिरातींमध्येही दिसली आहे. लवलीनला पाहिल्यावर तिच्यात माधुरीची प्रतिमा स्पष्टपणे दिसते. पण लवलीनने नेहमीच स्वत: ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी काम केले आहे.

निक्की वालिया…
निक्की वालिया ही एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि ती बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखीच दिसते. निक्कीला माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी म्हणतात. बर्‍याच फोटोंमध्ये निक्की पूर्णपणे माधुरीसारखीच दिसते.तिच्या एका मुलाखतीत निक्कीने हा खुलासा केला आहे की, माधुरीने तिलाही सांगितले आहे की लोक तुझी तुलना माझ्याशी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published.