या बालकालकार अभिनेत्रीने लवकर मोठे होण्यासाठी घेतले हार्मोनल इंजेक्शन्स.. 2 वर्षांत झाला असा बदल विश्वास नाही बसणार..

अभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत बालकलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत. पण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. पण काही कलाकार असे होते ज्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली.

आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरिअल्स मधून बाल कलाकार म्हणून केली. नंतर आपल्या अदाकारीच्या जोरावर ती चित्रपटां मध्ये ही झळकली. आणि नंतर मोठी झाल्यावरही आपला जलवा कायम ठेवला. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ही सुंदरी..

आम्ही बोलत आहोत अभिनेत्री हंसिका मोटवानी बद्दल. आपण सर्वांनी तिचे नाव ऐकले असेलच. जरी बॉलिवूडमध्ये हंसिकाने इतके नाव कमावले नसले, तरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये हंसिका ही नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. हंसिकाने बाल कलाकार म्हणून 2003 मध्ये ‘शक लका बूम बूम’ या टीव्ही सिरिअल मधून करिअरची सुरूवात केली होती.

विशेष बाब म्हणजे आपल्या गोंडस लूक मुले हंसिका ही तिच्या पहिल्या शोपासूनच सर्वांची आवडती झाली. त्यानंतर ती सतत अनेक टीव्ही कार्यक्रम करत राहिली. देस मे निकला होगा चांद, क्योंकी सास भी कभी बहु थी, सोन परी, करिश्माका करिश्मा आणि हम दो है ना… हे टीव्ही शो आहेत ज्यामध्ये हंसिका झळकली होती.

त्यानंतर हंसिकाने काही बॉलिवूड चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले. तिथेही तिने उल्लेखनीय कामगीरी केली. कदाचित आपल्याला माहीत नसेल की हंसिकाचे कुटुंबिय बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. हंसिकाने मुंबईतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ती तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत सामील झाली आणि ती खूप प्रसिद्ध झाली आहे. 2003 मध्ये हंसिकाने अनेक टीव्ही कार्यक्रमानंतर हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटात काम केले होते.

या चित्रपटात हंसिकाला बाल कलाकार म्हणून दिसली होती. यानंतर, 2007 मध्ये हंसिका हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरुर’ चित्रपटातून मुख्य नायिकेच्या भूमिकेत अवतरली. आपल्याला विश्वास नाही बसणार की ‘आप का सुरूर’ या चित्रपटात नायिका म्हणून काम करताना हंसिका फक्त 16 वर्षांची होती. यात तीने मुख्य अभिनेत्रीचे पात्र निभावले.

हा चित्रपट सुपर हिट ठरला होता. त्या काळात हंसिकाने आवल्यापेक्षा 18 वर्षाने मोठ्या हिमेश रेशमियासोबत रोमान्स केला. हंसिका अचानक खूप मोठी दिसू लागली. त्याच वर्षी त्याने दक्षिणच्या ‘देसमदूरु’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.

परंतु हंसिकाच्या यशामागे त्याच्या आईचा हात असल्याचे सांगण्यात आले. आणि ही गोष्ट हंसिकाने च वारंवार मान्य केलेली आहे. हंसिकाची आई पेशाने त्वचारोगतज्ज्ञ आहे आणि असे म्हटले जाते की हंसिकाच्या अचानक मोठे दिसण्याचे रहस्य तिला दिले गेले हार्मोनल इंजेक्शन्स होते जे ते होते आईने त्याला दिले होते.

हंसिकाच्या आईने तिला लवकर मोठे व्हावे अशी इच्छा होती, ज्यामुळे तिने हे इंजेक्शन आपल्या मुलीला दिले. तरीही आजवर हंसिकाने याबद्दल कोणतेही विधान दिलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.