बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी चित्रपट जगातील सुप्रसिद्ध कुटुंबांमध्ये लग्न केले आहे. सासरे किंवा बॉलिवूडमधील अनेक नामांकित कलाकारांचे देखील इंडस्ट्रीत एक मोठे नाव आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील कुटुंबांचा जावई बनलेल्या अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत…
धनुष…
धनुष हा दक्षिण भारतीय चित्रपटांमधील एक मोठे नाव आहे. तसेच रजनीकांतची दक्षिणमधे देवा सारखे पुजले जाते. धनुष आणि रजनीकांत यांचे सासरा- जावंई असेेे नाते आहे. सुपरस्टार रजनीकांतची मोठी मुलगी ऐश्वर्याने धनुषशी लग्न केले आहे. 2004 मध्ये धनुष आणि ऐश्वर्याने सात फेऱ्या मारल्या. आपल्या सासर्यांप्रमाणेच धनुषचीही जोरदार फॅन फॉलोइंग आहे.
कुणाल खेमू…
अभिनेता कुणाल खेमू 90 च्या दशकात अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसला होता. त्याचबरोबर तो मोठा झाल्यावरही अनेक चित्रपटांत दिसला आहे. सन 2015 मध्ये कुणाल खेमूने अभिनेत्री सोहा अली खानशी लग्न केले. सोहा अली खान पतौडी कुटुंबातील आहे. असे म्हटले जाते की सोहा आणि कुणालचे प्रेमसंबंध 2009 च्या ‘धूडते रह जाओ, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुरू झाले होते.
अक्षय कुमार…
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने 2001 साली अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले. अक्षय कुमार हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया व राजेश खन्ना यांचा जावई आहे. अक्षय आणि ट्विंकलला दोन मुले आहेत, मुलगा आरव आणि मुलगी नितारा.
अजय देवगण…
दिग्गज अभिनेता अजय देवगन हा सुप्रसिद्ध कुटूंबाचा जावई आहे. 1999 मध्ये अजय आणि काजोलचे लग्न झाले होते. काजोलचे संपूर्ण कुटुंब फिल्मी दुनियेशी संबंध ठेवते. अजयची आई तनुजा या अभिनेत्री असून तिचे वडील सोमू मुखर्जी दिग्दर्शक होते.
आयुष शर्मा…
अभिनेता आयुष शर्मा ‘लवयात्री’ चित्रपटामुळे चर्चेत आला होता. आयुष शर्मा बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध खान या खानदानातील जावई आहे. आयुषचे 30 नोव्हेंबर 2014 रोजी ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची मुलगी आणि अभिनेता सलमान खान, सोहेल खान आणि अरबाज खान यांची बहीण अर्पिता खानसोबत लग्न झाले होते. आज आयुष आणि अर्पिता एका मुलाचे पालक आहेत.
कुणाल कपूर…
कुणाल कपूर हा बच्चन कुटुंबाचा जावई आहे. अभिनेता कुणाल कपूरने 2015 मध्ये अमिताभ बच्चनचा धाकटा भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी नैनाशी लग्न केले होते.कुणाल कपूर ‘रंग दे बसंती’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता.