बॉलिवूड मधील या कलाकारांकडे आहे स्वतःचे प्रायव्हेट जेट!!

चित्रपट सेलिब्रिटी आपले आयुष्य अतिशय विलासी पद्धतीने जगतात. सोशल मीडियावर त्यांनीं शेअर केलेले फोटो पाहून याचा अंदाज बांधला जाऊ शकतो, परंतु बर्‍याच चित्रपट सेलिब्रिटी असे आहेत ज्यांचे स्वतःचे जेट प्लेन ही आहे. तथापि बॉलिवूडमधील बहुतेक सेलेब्रिटींनी स्वत: चे जेट विमान आहे हे मान्य करण्यास ते नकार देेेेतात.

शाहरुखख खानने बर्‍याच वेळा नकार दिला आहे की त्याच्याकडे स्वतःचे जेट प्लेन आहे, तरी असे काही बॉलीवूड सेलिब्रिटी आहेत त्यांचे स्वतःचे खासगी जेट आहे.

अजय देवगण
काही मीडिया रिपोर्ट्स वारंवार दावा करतात की अजय देवगणकडे हॉकर 800 विमान आहे, जे 6 सीटर जेट आहे. अजय देवगन सहसा प्रमोशनल इव्हेंट्स आणि शूटसाठी आपली जेट विमान अधिक वापरतो.

अक्षय कुमार
अक्षय कुमार देखील देशातील सर्वाधिक कमाई करणारा कलाकार आहे. अक्षय कुमारकडे स्वत: चे 260 कोटींचे खासगी जेट विमान आहे. एकीकडे अक्षय कुमार लोकांना मदत करण्यासाठीही ओळखला जातो, तर दुसरीकडे अक्षय कुमार आपल्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जातो.

अमिताभ बच्चन
बॉलिवूड सेलिब्रिटींना विमानतळावर स्पॉट केल्याच्या बातम्या आपण सामान्यत: वाचतो पण अमिताभ बच्चन ला विमानतळावर कधीहि पाहिले गेले नाही. अशा परिस्थितीत अमिताभ बच्चन चे स्वतःचे वैयक्तिक विमानही असावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही वर्षांपूर्वी बिग बीला प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर अभिषेक बच्चन ने त्याच्या विमानाची एक झलक शेअर केली होती.

प्रियंका चोप्रा
प्रियांका चोप्रा आता बॉलिवूड अभिनेत्रीच नाही, तर हॉलिवूडमध्येही तिची चांगली पकड आहे. प्रियांका आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक कामासाठी बर्‍याचदा न्यूयॉर्क किंवा लंडनहून भारतात येत-जात असते. अशा परिस्थितीत प्रियंका तिच्या स्वत: च्या खासगी विमानातच प्रवास करते.

शिल्पा शेट्टी
फिल्म अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा देखील त्यांच्या आलिशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात. जगातील बर्‍याच भागात त्यांची मालमत्ता आहे आणि शिल्पा शेट्टी हीच्याकडे स्वत: चे खासगी जेट विमानही असल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.