बॉलिवूड आणि टीव्ही जगाचा लोकप्रिय चेहरा असलेला अभिनेता मुकेश खन्ना आजकाल आपल्या वक्तव्यांबद्दल चर्चेत आहे. अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये न जाण्याच्या आपल्या विधानामुळे तो वादातपडला होता. यापूर्वी सोनाक्षी सिन्हाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झाला होता.
मुकेश खन्ना ला हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जात आहे की, 62 वर्षानंतरही त्याने आपल्या आयुष्यात आतापर्यंत लग्न का केले नाही? बरेच लोक म्हणतात की वैयक्तिक आयुष्यात तो ‘महाभारत’ मधल्या भूमिका घेतलेल्या भीष्म पितामहच्या व्यक्तिरेखेचे अनुसरण करतो.
मात्र, नुकत्याच झालेल्या मुलाखतीत अभिनेताने हे रहस्य स्वतः उघड केले आहे. ते म्हणाले, ‘एक काळ असा होता की हा प्रश्न पत्रकाराचा आवडता प्रश्न असायचा’. तो लग्नाच्या विरोधात असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे, म्हणून आजपर्यंत त्याने लग्न केले नाही.
मुकेश पुढे म्हणतो की ‘लोक म्हणतात की मी महाभारतात भीष्म पितामहची भूमिका केली आहे. यामुळे, मी हे माझ्या वैयक्तिक आयुष्याला देखील जोडतो. म्हणून मी लग्न केले नाही. मला सांगायचे आहे की भीष्म पितामह होण्यासाठी मी इतका महान नाही.
भीष्म पितामहांसारखे कधीही लग्न करणार नाही असे वचन मी कधीही घेतले आहे. मला हे देखील सांगायचे आहे की मी जितका लग्नचा आदर करतो तितका आदर कुनीही करत नसेल. मी लग्नाच्या विरोधात नाही. माझा विश्वास आहे की विवाहसोहले नशीबात लिहिलेली असतात. हे अफेयर्सच्या बाबतीत असे घडत नाही. ‘
मुकेश पुढे म्हणाला की, ‘लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे एकत्रिकरण. जोड्या स्वर्गात बनतात. दोन कुटुंबे लग्नात एकत्र येतात. तसेेच त्यांचे जीन्स एकत्र येतात. माझ्या मते कोणालाही सत्य माहित नाही. माझे लग्न झाले असते तर आतापर्यंत झाले असते. ‘
मला लग्न करण्यासाठी कोणतीही मुलगी जन्माला येणार नाही. लग्न ही माझी वैयक्तिक बाब आहे. मला पत्नी नाही. कृपया ही सर्व वादविवाद येथे संपवा.
नुकताच मुकेश खन्ना म्हटले आहे की, त्याला ‘द कपिल शर्मा शो’ अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच तो शोला आमंत्रण मिळाल्यानंतरही तेथे पोहोचला नाही. त्यावर बरीच खळबळ उडाली होती. गजेंद्र चौहान याच्याशीही त्याचा वाद झाला होता.