सलमान खान ने केला चित्रपटदारम्यान झालेल्या किसिंग सिन संबंधी आश्चर्यकारक खुलासा!!

राधे या चित्रपटात सलमान खान आणि दिशा पाटनी लवकरच दिसणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता, जो चाहत्यांना खूप आवडला. यानंतर दोघांचे सॉन्ग सीटी मार रिलीज झाले. सलमान आणि दिशाची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली आहे.आता निर्मात्यांनी गाण्यांचा बिहाइंड द सीन्स व्हिडीओ सामायिक केला आहे, व सलमान दिशाबद्दल बोलत आहे आणि त्या बरोबरच तो दोघांच्या वयाची खिल्लीही उडवत आहे.

सलमान म्हणतो की, ‘ तिने आश्चर्यकारक काम केले. ती खूप सुंदर दिसत आहे. आम्ही दोघेही म्हातारे आहोत नाही, ति माझ्या वयाची नाही, मी तीच्या वयाचा वाटत आहे. ”चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताना या दोघांचा एक किसिंग सीन दाखविण्यात आला होता ज्याने बरीच प्रसिद्धी मिळवली. दोघांचा किसिंग सीन पाहून चाहत्यांना धक्का बसला कारण सलमान कधीही ऑनस्क्रीनवर किस करत नाही. आता स्वत: सलमाननेही या दृश्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान किसिंग सीनवर म्हणाला…
सलमानने किसिंग सीनबद्दल सांगितले की त्याने दिशाला डायरेक्ट किस केली नाही. सलमान म्हणाला, या चित्रपटात नक्कीच एक किस आहे. पण दिशा बरोबर नाही. टेप वर किस आहेेे, टेप वर.

तसे, सलमानच्या खुलासापूर्वी काही वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर या गोष्टीचा खुलासा आधीच केला होता. वास्तविक, त्याने सलमानचा किसिंग सीन ब्राइट करून सांगितला होता. की दिशाच्या तोंडावर एक टेप लावलेेला आहे आणि टेपवर सलमान कीस करतो.

सलमानने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत आपल्या किसिंग पॉलिसीबद्दल सांगितले होते की, जेव्हा आम्ही कुटूंबासमवेत हा चित्रपट पाहतो आणि किसिंग सीन येते, तेव्हा आम्ही सर्वजण आजूबाजूला पाहू लागतो, हे फार विचित्र वाटते. तसेच मैंने प्यार कियाा मद्ये इंटीमेट सीन्स डायरेक्ट नाहीत.

ट्रेंड बदलला आहे, परंतु मी अद्यापही बोल्ड सीन्स मुळे अनकम्फर्टेबल आहे. जेव्हा मी चित्रपट बनवितो तेव्हा मी असा विचार करतो की हा चित्रपट पाहण्यास संपूर्ण कुटुंब सक्षम असेल. जास्तीत जास्त मी माझा शर्ट काढतो. काहीं डायलॉग्स मद्ये नॉटी जोक्स टाकतो. पण मी तुम्हााला लव्ह मेकिंग सीन्स करताना दिसणार नाही.

राधेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात सलमानबरोबर दिशा पाटणी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. प्रभु देवा दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. थिएटर व्यतिरिक्त आपण जी5 वर ‘जी पे’ व्यू ‘सर्व्हिस झेडईप्लेक्स, जी भारतातील प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जी5 आणि सर्व प्रमुख डीटीएच ऑपरेटर म्हणजेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटलवर आपन हा चित्रपट पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published.