अमिताभ नव्हे तर स्वतःपेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या या अभिनेत्यासोबत रेलशन मध्ये होती अभिनेत्री रेखा,जमणार होते लग्न परंतु….

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज रेखा तिच्या काळातील एक यशस्वी आणि नामांकित अभिनेत्री आहे. तिच्या उत्तम काम आणि तिच्या सौंदर्याबरोबरच रेखा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत राहीली आहे. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि रेखाचे अफेेअर बरेच चर्चेत रााहिले आहे. या अफेेअर ला बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेचा विषयही म्हणतात.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यादरम्यान हे दोघेही एकमेकांना हृदय देऊन बसले होते. विशेष म्हणजे रेखाच्या अफेअरच्या वेळी अमिताभ विवहित होता. त्यामुळे या प्रेमाला गंतव्य मिळू शकले नाही. 1981 मध्ये रिलीज झालेल्या सिलसिला या चित्रपटात हे दोन्ही कलाकार शेवटच्यावेळी एकत्र दिसले होते. रेखा अमिताभ सोबतच नव्हे तर इतरही अनेक अफेेअरबाबत ती चर्चेत राहिली आहे.

दिवंगत अभिनेता विनोद मेहरा याच्याशीही रेखाचे नाव संबंधित होते. असे म्हणतात की दोघांचेही लग्न झाले होते, पण ते लवकरच वेगळे झाले होते. रेखाचे अफेअर तिच्या वयापेक्षा जास्त वयाच्या कलाकारांशी होते, त्याचवेळी रेखापेक्षा कमी वय असलेले अभिनेता अक्षय कुमार आणि संजय दत्त यांच्याबरोबर अफेअरच्या बातम्या खूप उडाल्या होत्या.

असे म्हणतात की ‘खिलाडी के खिलाडी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेखा आणि अक्षय यांच्यातील जवळीक वाढली होती. अक्षयच्या रेखाशी जवळीक वाढल्याने अक्षय आणि रवीनाचा ब्रेकअप झाल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रेखाच्या संजय दत्तसोबत अफेअरच्या बातम्यादेखील आल्या होत्या. तसेेच संजय दत्तने नंतर ती केवळ एक अफवा आहे म्हणून सांगितलं होत. तसेच त्या दोघांचे लग्न होणार असल्याचे सांगितले जात होते.

रेखा आणि संजय दत्तच्या अफेअरची अफवा ‘जमीन आसमान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उडाली होती. असे म्हणतात की एकत्र काम करताना दोघेही एकमेकांचे अगदी जवल आले होते. तथापि, संजय दत्तच्या म्हणण्यानुसार खरोखर असे काही नव्हते.

80 च्या दशकात संजयची कारकीर्द चांगली चालली नव्हती, तर दुसरीकडे तो व्यसनाच्या आहारी गेलेला होता. या कठीण काळात रेखा ही संजयची साथ देत होती आणि या संकटातून मुक्त होण्यासाठी त्याला मदत करत होती, पण कोणीतरी याला अफेअर चे रुप दिलेेे होते.

Leave a Reply

Your email address will not be published.