आई होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात आनंददायक भावना मानली जाते. कित्येक अभिनेत्रींनीही आई होण्याची ही अद्भुत भावना चाहत्यांसह सामायिक केली आहे. अश्या काही अभिनेत्री होत्या ज्यांनी बऱ्याच काळाने माता होण्याचा निर्णय घेतला होता, तर काही अभिनेत्री बालिग होण्यापूर्वीच गर्भवती झाल्या होत्या.
मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री 90 च्या दशकात बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. भाग्यश्री वयाच्या 17 व्या वर्षी आई बनली होती.
भाग्यश्रीने 1990 मध्ये हिमालय दासानीशी लग्न केले होते. वयाच्या 17 व्या वर्षी भाग्यश्रीने पहिल्या मुलाला जन्म दिला. आज भाग्यश्री 2 मुलांची आई आहे. बर्याच माध्यमांच्या वृत्तानुसार, भाग्यश्री हिमालय दासानीशी लग्नापूर्वीच गर्भवती झाली होती.
एकता कपूरच्या शो कसौटी जिंदगी की या कार्यक्रमात कोमलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी ढोलकियाही अगदी लहान वयातच आई झाली.
उर्वशी ढोलकिया चे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले होते आणि वयाच्या 16 व्या वर्षी ती सागर आणि क्षितिज या जुळ्या मुलांची आई झाली. असं म्हणतात की लग्नाच्या दीड वर्षानंतर ती पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर तिने दोन्ही मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ केला.
1972 मध्ये राजेश खन्ना ने स्वत: पेक्षा 14 वर्षांनी लहान असलेल्या डिंपल कपाडियाशी लग्न केले होते. त्यावेळी डिंपल अवघ्या 15 वर्षांची होती.वयाच्या 16 व्या वर्षी डिंपल कपाडिया गर्भवती झाली आणि तिचा डेब्यू फिल्म बॉबी रिलीजच्या काही महिन्यांनंतर तिने ट्विंकल खन्नाला जन्म दिला.