‘देवमाणूस’ मालिकेतील नव्याने एंट्री झालेली मंजुळा आहे खऱ्या आयुष्यात शेवंता पेक्षा ग्लॅमरस.. फोटोज होतायत व्हायरल..

झी मराठी आणि मराठी माणूस यांच्यात एक अतूट नातं आहे. झी मराठी वर अश्या अनेक सीरिअल्स आल्या आहेत ज्या संपून एक मोठा काळ उलगडला तरीही अजूनही त्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचा दुसरा भाग नुकताच संपला. ही मालिका अतिशय प्रसिद्ध झाली ती अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या गाजलेल्या लव्ह स्टोरीमुळे.

आता रात्रीस खेळ चाले ही मालिका संपून तिच्या जागी ‘देवमाणूस’ ही नवीन मालिका सुरू झाली आहे. ही मालिका देखील अतिशय लोकप्रिय होत आहे. एका गावात डॉक्टर म्हणून वावरणाऱ्या सिरिअल किलरची ही गोष्ट आहे ज्याला गावातले लोक देवमाणूस समजत आहेत. या डॉक्टर ची भूमिका अतिशय स्त्रीलंपट प्रकारची दाखवली असून अभिनेता किरण गायकवाड ही भूमिका निभावत आहेत.

भोळ्या भाबड्या स्त्रियांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा जीव घेणे हे या पात्राचं काम दाखवले गेले आहे. या मालिकेत एका नवीन स्त्रीपात्राने एन्ट्री घेतली आहे जिच्यावर या डॉक्टरचा जीव अडकला आहे. पण ती काही डॉक्टरला काही भिक घालत नाहीये. अशा या नवीन पाखराचं नाव मंजुळा आहे. चला तर मग जाणून घेऊया मंजुळाच्या खऱ्या आयुष्यातील माहिती.

मंजुळा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री प्रतिक्षा जाधव ही साकारत आहे. तिचा जन्म १७ जानेवारी १९९० ला झाला. ती मुळची पुण्यातलीच आहे. कॉलेजपासूनच तिला अभिनयाची आवड होती. तसेच ती उत्तम नृत्य सुद्धा करते. २००० मध्ये ‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटापासून तिने पडद्यावरील कामाला सुरुवात केली. ‘अरे देवा, जखमी पोलीस ३०२, तात्या विंचू लगे रहो, पावर, हे मिलन सौभाग्याचे’ असे चित्रपटही केले आहेत.

भुताचा हनीमून’ या चित्रपटातील अभिनयामुळे ती जास्त प्रसिद्धीस आली. २०२० मध्ये ‘खेळ आयुष्याचा’ या चित्रपटातही तिने काम केले. ‘करून गेलो गाव’ अशाच अनेक नाटकातही तिने काम केले आहे. तिने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीबरोबरच तेलगू सिनेसृष्टीत सुद्धा काम केले आहे. प्रतिक्षाला आपण ‘मोलकरीण बाई, छोटी मालकीण, दिल ढुंढता है, दिल्या घरी तू सुखी रहा’

यांसारख्या मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिले आहे. ‘हे गणराया’ या अल्बममध्ये सुद्धा तिने काम केले आहे. सध्या ती ‘देवमाणूस’ या मालिकेत मंजुळाचे पात्र साकारत आहे. ही मंजुळा त्या वाईट डॉक्टरच्या जाळ्यात अडकेल का? हे आपल्याला मालिका पाहूनच समजेल.

नुकतेच एका मुलाखतीत प्रतीक्षा जाधवला तिच्या पुढच्या प्लॅन्स बद्दल विचारले असता तिने म्हटले की तिला सध्या अनेक ऑफर्स येत आहेत त्यातील काही ऑफर्स चित्रपटांच्या देखील आहेत. परंतु सध्याच्या घडीला ती फक्त टीव्ही सिरिअल्स वर लक्ष केंद्रित करणार आहे असं तिने सांगितलं आहे.

यापुढे प्रतीक्षा असं ही म्हणाली की देवमाणूस मधील मंजुळा या पात्रामुळे तिला खूप लोकं ओळखायला लागली आहेत. मंजुळा या पात्राचे अनेक चाहते आहेत. लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे ती भारावून जाते. याचे श्रेय तिने पूर्णपणे झी मराठी आणि देवमाणूसच्या पडद्याआडच्या टीम ला दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.