बॉलीवूडमधील या आश्चर्यकारक नात्यांबद्दल तुम्हाला नक्कीच माहीत नसेल!!

इमरान हाश्मी-आलिया भट्ट हे बहीण-भाऊ आहेत…
सीरियल किसर म्हणून ओळखला जाणारा इमरान हाश्मी बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्टचा भाऊ आहे. वास्तविक, आलिया भट्टचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि इम्रानची आई यांच्यात भाऊ-बहीण असे संबंध आहेत आणि आलिया आणि इमरान यांच्यातही हेच नाते आहे.

अमिताभ बच्चन आणि कुणाल कपूर यांच्यात असे नाते आहे…
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेता कुणाल कपूर यांचे विशेष नाते आहे. वास्तविक कुणाल कपूरने अमिताभ बच्चनचा धाकटा भाऊ अजिताभ बच्चन ची मुलगी नैनाशी लग्न केले आहे. कुणाल आणि नयना बच्चन यांचे 2015 साली लग्न झाले होते.

काजोल आणि राणी मुखर्जी बहिणी- बहिणी आहेत…
काजोल आणि राणी मुखर्जी या दोघांनीही हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच प्रतिष्ठा मिळविली आहे. 90 च्या दशकात या दोघींनी बॉलिवूडमध्ये खूप चांगली प्रसिद्धी मिळवली आहे. या यशस्वी झालेल्या दोन अभिनेत्रींमध्ये एक विशेष संबंध आहे. राणी आणि काजोलचे वडील भाऊ – भाऊ असल्याने त्या दोघिंमध्ये बहिण-बहिणीचे नाते आहे.

ऐश्वर्या राय आणि सोनू सूद-
ऐश्वर्या रायने सोनू सूद यांना भाऊ मनलेले आहे. ‘जोधा अकबर’ चित्रपटा नंतर या दोघांमधील हे संबंध तयार झाले.

रणवीर सिंग आणि सोनम कपूर…
आपण या नात्याबद्दल क्वचितच ऐकले असेल. आजचा सर्वात चर्चेत असणारा आणि यशस्वी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूरला काका मानले आहे, तर मग सोनम कपूर त्याची बहीण लागते. तसेच सोनम कपूरची आजी आणि रणवीर सिंगची आजी बहिणी बहिणी आहेत, ज्यामुळे दोन्ही कुटूंबात खूप जुने संबंध आहेत.

भाऊ-भाऊ आहेत आदित्य चोप्रा आणि करण जोहर…
बॉलिवूडमधला प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जौहर आणि सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यात भाऊ-भाऊ आशे संबंध आहेत. वास्तविक, करण जोहरची आई हिरू जोहर आणि आदित्य चोप्राचे वडील यश चोप्रा यांचे सख्खे भाऊ-बहीण असे संबंध आहेत. अशा परिस्थितीत करण आणि आदित्य एकमेकांचे भाऊ आहेत.

अमिताभ बच्चन ची मुलगी करीना कपूरची मेव्हणी आहे…
हिंदी चित्रपटसृष्टीची प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर अभिनेत्री करीना कपूर खान अमिताभ बच्चन ची मुलगी श्वेता बच्चन नंदाबरोबर खास नातं शेअर करते. श्वेता ही करिनाची आत्या रितू नंदाची सून आणि तिचा चुलत भाऊ निखिल नंदाची पत्नी आहे. अशा परिस्थितीत श्वेता बच्चन आणि करीना कपूर खान यांच्यात भाबी हे नाते निर्माण होते, आणि करीना श्वेताची मेव्हणी हे नाते तयार होते.

Leave a Reply

Your email address will not be published.