14 व्या वर्षीच अनाथ झालेल्या या अभिनेत्याचा जीवन प्रवास होय अत्यंत खडतळ…

बॉलीवूडमधील सर्किट नावाने प्रसिद्ध असलेला अर्शद वारसी 53 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 19 एप्रिल 1968 रोजी मुंबई येथे झाला होता. महाराष्ट्रात वाढवलेल्या, अर्शदने बालपणातच आई-वडील गमावले होते. जेव्हा तो 14 वर्षांचा होता तेव्हा त्याचे आई वडील वारले होते. यानंतर त्याला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला.

आर्थिक अडचणीमुळे त्याला दहावीनंतर शिक्षण सोडावे लागले आणि त्याने आपले सर्व लक्ष पैसे मिळवण्याकडे लावले. शिक्षण सोडल्यानंतर त्याने सेल्समन म्हणून नोकरी केेली. तो घरो-घरी जाऊन लिपस्टिक आणि नेल पॉलिश विकत असे. मग हळूहळू त्याचे नशिब बदलले आणि जया बच्चन ची नजर त्यावर गेली, आणि त्याला तेरे मेरे सपने या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

अर्शद वारसी ला नृत्य करण्याची खूप आवड होती. त्याने नृत्य करायला सुरूवात केली आणि त्याच्या कौशल्यामुळे तो अकबर समीच्या नृत्य गटात सामील झाला. त्यानंतर 1987 मध्ये ‘ठिकाना’ आणि ‘कश’ या चित्रपटात त्याला कोरियोग्राफची संधी मिळाली.

कोरिओग्राफर म्हणून त्याला यश मिळालं आणि अशा प्रकारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात झाली. तो पहिल्यांदा 1996 मध्ये ‘तेरे-मेरे सपने’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अरशदला जया बच्चन ने संधी दिली होती.

तेरे मेरे सपने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला होता. यानंतर अर्शदची इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण झाली. पण 2003 मध्ये आलेल्या राजकुमार हिरानी च्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाने त्याचे भाग्य उजळले.

या चित्रपटात तो सर्किटची भूमिका साकारून लोकप्रिय झाला होता. 2006 मधे लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटाद्वारेे तो बॉलिवूडमध्ये छायांकित झाला होता. या चित्रपटासाठी अरशद ला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.अर्शद हास्य शैलीचा दिग्दर्शक रोहित शेट्टीला खूप आवडला आणि त्याने गोलमाल चित्रपटासाठी त्याची निवड केली. गोलमालच्या सर्व मालिकांमध्ये अर्शद दिसला होता.

तसेच तेरे मेरे सपने’ हा त्याचा पहिला चित्रपट अमिताभ बच्चन याच्या प्रॉडक्शन हाऊस एबीसीएलच्या बॅनरखाली बनला होता. या चित्रपटा नंतर त्याला 3 वर्षे कोणतेही काम मिळाले नव्हते.संघर्षाच्या दिवसांत पत्नी मारिया नोकरी करायची असे अरशद वारसी ने सांगितले होते. यावेळी, त्याचे घर पत्नीच्या पगाराने चालत असे. अरशद आणि मारिया यांचे 14 फेब्रुवारी 1999 रोजी लग्न झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.