आज वेस्ट इंडीजचा माजी फलंदाज विव्ह रिचर्ड्सचा 69 वा वाढदिवस आहे. रिचर्ड्सचा जन्म 7 मार्च 1952 रोजी अँटिगा येथे झाला होता. तो त्याच्या काळातील मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे, जो अद्यापही जगभरात लोकप्रिय आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरसह असे अनेक क्रिकेटपटू आहेत, जे रिचर्ड्सला आपला आदर्श मानतात.
रिचर्ड्सनेे 1974 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने 17 वर्षे क्रिकेट विश्वात वर्चस्व गाजवले आहे. त्याने वेस्ट इंडिज संघासाठी 308 आंतरराष्ट्रीय सामने खेलला आणि फलंदाजीने लोकांची मने जिंकली. ही क्रिकेटची बाब झाली, तो तसेच त्याच्या कॉन्ट्रोवर्शियल लव लाइफमुळेही चर्चेत आला आहे. त्याच अफेअर अभिनेत्री नीना गुप्ता बरोबर होतेे, आणि निना लग्न न करता एका मुलीची आई बनली.
80 च्या दशकात वेस्ट इंडीज क्रिकेट संघ क्रिकेट खेळण्यासाठी भारतात आला. ज्यात विव्हियन रिचर्ड्स देखील होता. त्यावेळी विव्हियनचे लग्न झाले होते आणि त्याला दोन मुले होती. रिचर्ड्स आणि नीना यांची मुंबईतील एका पार्टीत भेट झाली होती. यानंतर दोघांनीही एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली. त्या दोघांची बरीच जवळीक वाढली. काही वर्षानंतर नीनाच्या गरोदरपणाची बातमी येऊ आली आणि नंतर ही बातमी सत्य ही होती.
1988 मध्ये नीना म्हणाली की तिला मूल हवे आहे पण त्या मुलाच्या वडिलांशी लग्न करणार नाही. नीनाची ही पायरी अतिशय धैर्यवान होती कारण प्रत्येकात असे करण्याची हिम्मत नाही. नीनाने हे करूनही हे दाखवले.
खरं तर, निनाला माहित होतं की ती रिचर्ड्सशी लग्न करणार नाही, म्हणून नीना तिच्या मित्रांकडे आणि कुटूंबाच्या विरोधात गेली आणि एका मुलीला जन्म दिला व तिचे नाव तिने मसाबा गुप्ता ठेवले. नीना आणि व्हिव्हियन दोघेही एकमेकांना आवडत असत पण दोघांनी कधी लग्न केले नाही. नीनाने आयुष्य असेच घालवले. मुलीला चांगले संगोपन केले. मसाबा एक मोठी फॅशन डिझायनर आहे. नीना आणि तिची मुलगी मसाबा अनेकदा वेस्ट इंडीज आणि इंग्लंडमध्ये विव्हियन रिचर्ड्सलां भेटण्यासाठी जातात.
लग्न न करता मुलाला जन्म देण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना नीना म्हणाली की तिच्यासाठी कठीण भाग म्हणजे मसाबाला जन्म देण्याचा नव्हता, परंतु अडचण हि होती की आपण काय एक्सेप्ट केले आणि ते कसे करावे याचा निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी बर्याच लोकांनी त्याच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि म्हणाले की यामुळे तुझ्या बाळाला नाव मिळेल. नीनाने उत्तर दिले की ती कमाई करू शकते आणि. बाळालाही सांभाळू शकते.
आयुष्यातील काही गोष्टींबद्दल तिला खेद वाटतो असे नीना एका मुलाखतीत म्हणाली की. मी योग्य वयात लग्न करायला पाहिजे होतेे व माझ्या कुटुंबास वाढवायला पाहिजे होतेे. तथापि, लग्नाबद्दल तिला कधीच उत्सुकता वाटली नव्हती परंतु जेव्हा तीची मुलगी मोठी झाली, तेव्हा तिला एकटे वाटू लागले आहे.