वयाच्या 53 व्या वर्षी अडकली होती ही अभिनेत्री विवाहबंधनात , लग्नाआधीच केली पतीने आ’त्मह’त्या!!

ज्येष्ठ अभिनेत्री नंदा चे 25 मार्च 2014 रोजी मुंबईत निधन झाले. तिचे संपूर्ण नाव नंदा कर्नाटकी होते. सुरुवातीला बॉलिवूडमध्ये नंदाची प्रतिमा लहान बहिणीची होती. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ती, बहुतेक चित्रपटांमध्ये ती लहान बहिणीच्या भूमिकेत येत असे.

पण नंतर तिने ते बदलले. नंदा ला फिल्ममेकर मनमोहन देसाई वर प्रेम झाले होते. 1992 मध्ये वयाच्या 53 व्या वर्षी नंदानेही त्यांच्याशी सगाई केली होती. पण तिच्या नशीबात लग्न नव्हते. लग्नाआधीच मनमोहन देसाई ने आजारामुळे आ’त्मह’त्या केली. यानंतर नंदाने कधीच लग्न केले नाही.

नंदा तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. वयाच्या पाचव्या वर्षी तिने काम करण्यास सुरवात केली होती. त्या काळात ती मुख्य अभिनेत्याची धाकटी बहीण म्हणुन भुमिका सजरत असे आहे. पण नंतर तिने आपली प्रतिमा बदलली आणि चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले.

1944 मद्ये जेव्हा ती पाच वर्षांची होती. एक दिवस जेव्हा ती शाळेतून परत आली तेव्हा तिचे वडील म्हणाले की तयार राहा.चीत्रपटासाठी तुझे शूटिंग आहे. यासाठी आपल्याला केस कापून घ्यावे लागतील. नंदाचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी मराठी चित्रपटांचे यशस्वी अभिनेते आणि दिग्दर्शक होते. केस कापावे लागतील, हे ऐकून नंदा नाराज झाली.

एका मुलाखतीत नंदाने सांगितले होते- मी माझ्या वडिलांना सांगितले की मी शूटिंग करणार नाही. तथापि, आईच्या सांगण्यावरून मी शूटसाठी जाण्यास तयार झाले. तिथे माझे केस मुलासारखे लहान कापले गेले. या चित्रपटाचे नाव मंदिर होते. चित्रपटाचे दिग्दर्शक नंदाचे वडील दामोदर होते. हा चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच नंदाच्या वडिलांचा मृ’त्यू झाला. घराची आर्थिक परिस्थिती ढासळत असताना जबाबदारी नंदाच्या छोट्या खांद्यांवर पडली. सक्तीनेे ती चीत्रपटांमध्ये काम करू लागली.

1959 मध्ये नंदाने छोटी बहान या चित्रपटात बलराज सहानी आणि रहमानच्या अंध बहिणीची भूमिका केली होती. ते पात्र इतके आवडले की त्या काळात लोकांनी तिला शेकडो राख्या पाठवल्या. त्याच वर्षी तिचा राजेंद्र कुमार सोबतचा चित्रपट धूल का फूल सुपरहिट ठरला. या चित्रपटाने नंदाला चर्चेत आणले. बहिणीच्या भूमिका तिचा पाठलाग सोडत नव्हत्या, 1960 च्या काला बाजारात नंदा पुन्हा एकदा देव आनंदची बहीण बनली.

Leave a Reply

Your email address will not be published.