लग्न होताच बॉलिवूडला राम राम..अशी काहीशी आहे या अभिनेत्रीची बॉलीवूड कारकिर्द!!

बॉलिवूडमध्ये बऱ्याचदा असे पाहायला मिळते की, लग्नानंतर अभिनेत्रींनी स्वत: ला फिल्म च्या पडद्यापासून दूर केले, पण अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांना लग्नानंतरही इंडस्ट्रीत चांगले नाव मिळविण्यात यश आले आहे. तथापि, अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटांपासून दूर केले होते. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा नामांकित अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत. तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्रींविषयी…

ट्विंकल खन्ना…
ट्विंकल खन्नाने 2001 मध्ये सुपरस्टार अक्षय कुमारशी लग्न केले होते. 1995 साली बरसात या चित्रपटाद्वारे पदार्पण करणार्‍या ट्विंकलची कारकिर्द खूपच लहान राहीली. अक्षयशी लग्नानंतर तिने हिंदी सिनेमापासून स्वतः ला दुर केेले. व ती सध्या लेखक आणि चित्रपट निर्मााती म्हणून काम करत आहे.

सोनाली बेंद्रे…
सोनाली बेंद्रे ने अजय देवगन, शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या मोठ्या स्टार्ससह स्क्रीन शेअर केली आहे. 1994 मध्ये तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. 2002 साली बॉलिवूड दिग्दर्शक गोल्डी बहलशी लग्नानंतर तिने अभिनयाच्या जगाला निरोप दिला आहे.

असिन…
असिनने आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान सारख्या सुपरस्टार्स बरोबर काम केले आहे. असिनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2008 मध्ये आलेल्या ‘गजनी’ या चित्रपटाद्वारे केली होती. या चित्रपटात तीच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत होता. 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्माशी लग्न करून असिन चित्रपटांपासून दूर झाली.

जेनेलिया डिसूजा…
जेनेलियाने बॉलिवूडच्या निवडक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेनेलियाच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003 मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून झाली. 2012 मध्ये जेनेलिया डिसूझाने अभिनेता रितेश देशमुखशी लग्न केले आणि तिने स्वत: ला अभिनयापासून दूर केले.

मीनाक्षी शेषाद्री…
दामिनी, प्घातक, घायाळ अशा अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम करणारी नामांकित अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री चा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. मीनाक्षी शेषाद्री जेव्हा तिच्या करियरच्या शिखरावर होती तेव्हा तिने हरीश म्हैसूरशी लग्न केले होते. लग्नानंतर तिने बॉलिवूडसह भारत देखिल सोडला. ती आता आपल्या कुटूंबासह अमेरिकेत राहते. मीनाक्षी आणि हरीश हे एका मुुलाचे आणि एका मुलीचे पालक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.