अभिनेता अरबाज खान आणि मलायका अरोरा विभक्त होऊन बरेच दिवस झाले आहेत. आज मलायका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, तर अरबाज खान मॉडेल जॉर्जिया अँड्रानीसोबत दिसला आहे.
कार्यक्रमात दाखल झालेल्या अरबाजला मलायका आणि अर्जुनच्या लग्नाशी संबंधित पत्रकारांनी विचारले तेव्हा नेमक काय घडलं ते जाणून घ्या.
खरं तर, पत्रकारांनी अरबाजला प्रश्न विचारला की अर्जुन आणि मलायका लग्न करणार आहेत असं ऐकलं आहे? या प्रश्नावर अरबाज हसला आणि म्हणाला, ‘पाजी, तुम्ही खूप इनटीलीजेनंट प्रश्न विचारला आहे! तुम्ही खूप कष्ट केले असतील, तुम्ही त्यावर रात्रभर बसलेले असावे. ‘
अरबाज इथेच थांबला नाही, तो म्हणाला, ‘पाजी मला तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे, पण तुम्ही विचार करायला इतका वेळ दिला,तर मलाही थोडा वेळ द्या!’ मी उद्या सांगेल, चालेल?
पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अरबाज हसला आणि तेथून निघून गेला. मलायकापासून घ’टस्फो’ट घेतानाही अरबाजने स्पष्टपणे म्हटले होते की, माझ्यात आणि मलायकात सामान्य गोष्टी नाहीत. अरबाजच्या म्हणण्यानुसार आम्ही आमच्या जीवनाशी संबंधित निर्णय घेतला आणि स्वतःच्या मार्गावर पुढेे जाणे चांगले होते आणि आम्ही तेच केले. ‘