या प्रसिद्ध अभिनेत्री सह रिलेशनशिप मध्ये होता महिंद्रसिंग धोनी,अभिनेत्रीने केला खुलासा!!

दक्षिण इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत नावलौकिक मिळवणारी राय लक्ष्मी बहुधा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. राय लक्ष्मीला दक्षिण इंडस्ट्रीची टॉप अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. राय लक्ष्मीने साऊथ इंडस्ट्री व्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु तिला ज्या प्रकारचे यश मिळेल असे वाटले होतेे, तशा प्रकारे तिला यश मिळाले नाही.

तसेच, राय लक्ष्मी तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहिली आहे. इतकेच नाही तर अभिनेत्री राय लक्ष्मीचे नावही महेंद्रसिंग धोनीबरोबर जोडले गेलेले होते, ज्यांच्याबद्दल तिने स्वतः सांगितलं होतं. तर मग आमच्या लेखात आपल्यासाठी काय खास आहे ते जाणून घेऊया?

राय लक्ष्मीने मॉडेलिंगद्वारे करिअरची सुरुवात केली, त्यानंतर तिने तमिळ चित्रपटांतून पदार्पण केले, त्यानंतर तिने कधीही आपल्या करिअरपासून माघार घेतली नाही. राय लक्ष्मीचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला होता, त्यानंतर हळू हळू तिने आपले मॉडेलिंग मद्ये करिअर केले. राय लक्ष्मीचे नाव अनेक अभिनेते आणि कलाकारांशी संबंधित आहे, परंतु महेंद्रसिंग धोनीबरोबर ती बर्‍याच दिवस ती चर्चेत होती. मात्र, महेंद्रसिंग धोनी राय लक्ष्मीबद्दल कधीच बोलला नाही.

राय लक्ष्मीने महेंद्रसिंग धोनी ला डेट केले आहे.राय लक्ष्मीने महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठा खुलासा देताना सांगितले की मी त्याला डेट केले होते. तथापि, त्यांच्या डेटिंगबद्दल महेंद्रसिंग धोनी कधीही काहीच बोलला नाही. इतकेच नव्हे तर राय लक्ष्मीने महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा फायदा तिने प्रसिद्धी मिळवण्यासाठी घेतला होता. ब्रेकअपनंतर राय लक्ष्मीने बराच गोंधळ उडविला होता, ज्यामुळे ती खूप चर्चेमध्ये राहीली होती.

2008 मध्ये राय लक्ष्मीची धोनीशी ओळख झाली होती.राय लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार, तिने 2008 च्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीची ओळख झाली होती, त्यानंतर दोघेही संबंधात आले.

राय लक्ष्मीच्या म्हणण्यानुसार दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केले होते पण नंतर आमचं भांडण झाल्याने आमचं नात तुटले. तथापि, महेंद्रसिंग धोनीने राय लक्ष्मीशी संबंध असल्याच्या बातमीची पुष्टी कधीच केली नव्हती, म्हणून राय लक्ष्मी च्या बोलण्याला कोणताही आधार सापडला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.