बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा या दिवसांमध्ये प्रियकर अर्जुन कपूरसोबत न्यूयॉर्कमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहे, त्याची काही छायाचित्रे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. अलीकडे मलायका अरोराने प्रियकर अर्जुन कपूरसोबतचे नाते अधिकृतपणे स्वीकारले आहे.
होय, अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा यांनी इंस्टाग्रामवर एक चित्र शेअर केले आहे, त्यानंतर दोघांनीही आपलं नातं स्वीकारलं आहे. या सर्वांमध्ये मलायका अरोरा ने एक मुलाखत दिली आहे, ज्यात तिने आपल्या मुलाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
ब्वॉयफ्रेंड समवेत न्यूयॉर्कमध्ये क्वालिटी टाइम घालविणारी मलायका तिच्या आईच्या भूमिकेविषयी बोलली आहे. खरं तर यापूर्वी आईची जबाबदारी न निभल्याचा तीच्यावर आरोप होता, ज्यावर तिने विधान दिलं आहे. तसेच तिनेअरबाज खानविषयीही एक विधान केले आहे, यामुळे तीची ही मुलाखत खूप वेगाने व्हायरल झाली आहे. मलायका अरोरा जेव्हापासून अरबाज खानला घ’टस्फो’ट दिला आहे. तेव्हापासून ती खूपच चर्चेत असते.
माझी जबाबदारी बदलली नाही – मलाइका अरोरा आपल्या मुलाबद्दल बोलताना मलायका अरोरा म्हणाली की मी अजूनही एक आई आहे, त्यामुळे माझी जबाबदारी बदलली नाही. मलायका पुढे म्हणाली की मी रिलेशनशिप मद्ये आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की मी माझ्या मुलाकडे लक्ष देत नाही, परंतु माझ्या जबाबदार्या बदलल्या नाहीत आणि मी त्या चांगल्या प्रकारे निभावत आहे, म्हणून कुनिही भाष्य करण्याची गरज नाही. मलायका अरोरा आणि तिचा मुलगा यांच्यात खूप चांगले संबंध आहेत कारण ते दोघेही एकमेकांना समजून घेतात.
माझा मुलगा पहिली माझी जबादारी आहे. मलाइका अरोरा
मलायका अरोरा म्हणाली की, अरबाजपासून विभक्त झाले तेव्हा मी थोडीशी निराश होते, कारण मला माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करायचा होता.पण नंतर मी त्याची आणि स्वतःची काळजी घेतली.
मलायका अरोरा म्हणाली की माझा मुलगा अरहान मला खूप समजुन घेतो आणि मीही त्याला खूप समजून घेते. आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी माझ्या मुलाने मला खूप साथ दिली आहे, त्यासाठी मी फक्त त्याला क्रेडिट देते.
मी आणि अरबाज आम्ही मूव ऑन झालो आहोत.मलायका अरोरा पुढे म्हणाली की, जेव्हा दोघे एकमेकांपासून विभक्त होतात तेव्हा त्यांच्यात काय घडले आहे, किंवा परिस्थिती कशी आहे याबद्दलच त्यांना चांगले माहिती असते, इतर लोक केवळ गोष्टी बनवतात.
मलायका अरोरा असेही म्हणाली की, विभक्त झाल्यास लोकांना कोणाचाही न्याय करण्याचा अधिकार नाही, कारण आपल्याला परिस्थितीबद्दल माहिती नसते. अशा परिस्थितीत मलाइका अरोरा म्हणाली की मी आणि अरबाज दोघेही आयुष्यात पुढे गेले आहेत.