जान्हवी कपूर ही बालीवूडच्या नवीन अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या वागण्याने पब्लिक चे मन कसे जिंकता येईल हे तिला माहित आहे. नुकताच इंस्टाग्रामवर जान्हवी कपूर ‘मला काहीही विचारा’ या सेशनदरम्यान चाहत्यांशी बोलताना दिसली आहे. यावेळी जान्हवी कपूरने बर्याच मजेदार प्रश्नांची उत्तरे दिली आहेत पण एका प्रश्नाच्या उत्तरात तिने उशीला मिठी मारून करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे अप्रतिम गाणे गायले जे तुम्हाला ही हसवेल.
या सत्रादरम्यान एका चाहत्याने जान्हवी कपूरला विचारले की, तुम्ही तुमची अस्वस्थता कशी रोखता? यासंदर्भात जान्हवी कपूरने खूप आनंददायक प्रत्युत्तर दिले, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ती म्हणाली की, ‘उशीला मिठी मारून SAD सॉन्ग’ आणि यासह तिने तीच्या गाण्याचा ही एक मजेदार व्हिडिओही शेअर केले.
या व्हिडिओमध्ये जान्हवी उशीला मिठी मारताना आणि गाणे गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवी करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाचे ‘आओगे जब तुम सजना’ हे गाणे गात असताना दिसली आहे.
नंतर ती गात असताना जान्हवी मोठ्याने हसली. या व्हिडिओमध्ये ‘आओगे जब तुम सजना’ गाताना ती रडण्याचा नाटक करताना दिसली आहे आणि म्हनत आहे – तू कधी येणार?
https://www.instagram.com/p/CMrFzOkBLru/?igshid=vlgagumojcb3
या सत्रात जान्हवी कपूरला तिच्या आवडत्या स्टारविषयीही विचारले गेले होते, ज्यावर तिने पंकज त्रिपाठी चे नाव घेतले होते. यादरम्यान तीने आपल्या ‘गुंजन सक्सेना’ चित्रपटा तील एक छायाचित्रही शेअर केले आहे, ज्यात पंकज त्रिपाठी तिला मीठी मारताना दिसत आहे.