ओळखा पाहू फोटोतील चिमुकली, आता झालीये प्रसिद्ध अभिनेत्री!!

राखी सावंत तिच्या बोल्ड स्टाईलसाठी ओळखली जाते. चॅलेंजर म्हणून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणारी राखीने तिच्या एंटरटेनमेंटने सर्वांना हसवले आणि तिने तिच्या चाहत्यांची मने जिंकण्यात यश मिळविले आहे. राखी सावंत 24 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे आणि दोन दशकांहून अधिक काळात, राखीने स्वत: हून आपली ओळख निर्माण केली आहे. राखीने लहानपणापासून ते तरूणपणापर्यंंतचा प्रवासाची काही फोटो शेअर केेली असून ती सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत राखीने लिहिले आहे की लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास..मला खूप आनंद झाला आहे. मी बरेच चढउतार पाहिलेले आहेत. माझ्या बालपणीच्या चित्रांबद्दल कृपया आपले मत द्या. राखीच्या या फोटोंना चाहत्यांकडून ही खूप प्रेम मिळत आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवरील चित्रांद्वारे तिच्या आयुष्यातील अशाच प्रकारच्या चढउतारांची कहाणी सांगितली.

अभिनेत्री राखी सावंत म्हणून इंडस्ट्रीमध्ये ओळखली जात असली तरी तिचे खरे नाव नीरू भेडा आहे. जेव्हा नीरूने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते तेव्हा तिने आपले नाव बदलून राखी सावंत असे ठेवले होते.

राखीचे बालपण बर्‍याच अडचणींमध्ये गेलेलं आहे. राखी आपल्या कुटूंबासमवेत मुंबईतील एका छोट्या चाळीत राहायची. घरात बरीच बंधने असूनही राखी ने बॉलिवूड आणि अभिनयात करिअर करण्याच ठरवलं होतं.

2007 मध्ये एका मैगजीनला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत ने सांगितले की तिचे कुटुंब अतिशय दारिद्र्यात आहे. आणि जेव्हा ती १०-११ वर्षांची होती तेव्हा तिने टिना अंबानीच्या लग्नात रोजच्या पगारासाठी 50 रुपये जेवणाची सेवा दिली होती.

https://www.instagram.com/p/CMbmBHLs5mp/?igshid=ka1exuk21n0a

इंडस्ट्रीमध्ये राखीनेही नावाप्रमाणेच पैसे ही मिळवले आणि तिचे कुटुंबही सेेटल झाले. सध्या राखी सावंत तिच्या आईसाठी झगडत आहे. तीच्या आईला कर्करोग आहे आणि केमोथेरपी चालू आहे. राखी सावंतचे चाहते तीची आई लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.