जेव्हा अमिताभ आणि ऐश्वर्या यांच्या रिलेशनशिप बद्दल झाला खुलासा….

महान अमिताभ बच्चन आणि त्याची सून ऐश्वर्या राय बच्चन यांचे एकमेकांशी खूप खास बॉन्डिंग आहे. अमिताभच्या घराची सून होण्यापूर्वी ऐश्वर्या राय त्याच्यासोबत ‘मोहब्बतें’ चित्रपटात दिसली होती. खास गोष्ट म्हणजे ‘मोहब्बतें’ मध्येसुद्धा अमिताभने ऐश्वर्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती, कदाचित बाहेरून खूप कठीण असेल, पण आतून तो आपल्या मुलीवर खूप प्रेम करत असतो.

बिग बीचीही वास्तविक जीवनात अशीच काहीशी परिस्थिती आहे. ऐश्वर्यावर त्याचे किती प्रेम आहे, हे त्याने एका मुलाखतीच्या वेळी सांगितले होते. अमिताभ म्हणाला होते की, ‘आमच्यासाठी काहीही बदलले नाही, एक मुलगी (श्वेता बच्चन नंदा) गेली आणि दुसरी (ऐश्वर्या राय बच्चन) आली.’

अमिताभ बच्चनच्या मोठ्या मुलीचे नाव श्वेता बच्चन नंदा असे आहे आणि बर्‍याचदा अमिताभ सोशल मीडियावर तिच्याबरोबर फोटो शेअर करत असतो. अमिताभ बच्चन ऐश्वर्या तसेच त्याची नात आराध्याशी खूप जोडलेला आहे. गेल्या वर्षी ऐश्वर्या आणि आराध्या दोघींनाही कोरोना झाला तेव्हा याचा एक खास मुद्दा पाहायला मिळाला होता. जेव्हा रुग्णालयातून ऐश्वर्या आणि आराध्या घरी परत आल्या तेव्हा अमिताभच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले होते.

अमिताभ ने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले होते की, ‘माझी लहान मुलगी व सून रुग्णालयातून बाहेर पडल्यावर मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. प्रभु, तुझी कृपा अपार आहे ‘.

Leave a Reply

Your email address will not be published.