बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आपल्या अभिनयाने बऱ्याच काळापर्यंत प्रेक्षकांची मने जिंकली. तेच त्या अभिनेत्रींच्या बहिणी बॉलिवूड मध्ये तेवढे नाव नाही कमवू शकल्या. बॉलिवूड मध्ये बऱ्याच अशा अभिनेत्री आहेत त्यांच्या बहिणी या चित्रपटात पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला त्याच अपयशी आणि यशस्वी बहिणींच्या जोडीबद्दल सांगणार आहोत.
डिंपल कापडिया आणि सिंपल कापडिया– हिंदी चित्रपटात डिंपल कापडिया यांची गणना ही दिग्गज अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉबी चित्रपटापासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या डिंपल कापडिया आतापर्यंत चित्रपटात सक्रिय आहेत. तेच त्यांची बहीण सिंपल कापडिया यांचा चित्रपटातील प्रवास फारसा खास नाही राहिला. सिंपल यांनी अनुरोध या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी काहीच चित्रपटात काम केले होते. त्यानंतर मोठ्या पडद्यावरून त्या गायब झाल्या.
ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना- अभिनेत्री ट्विंकल खन्ना आता चित्रपटापासून दूर आहे परंतु त्यांनी अनेक चित्रपटात अभिनय केला आहे आणि प्रेक्षकांचे मने जिंकली आहे. याव्यतिरिक्त ट्विंकल खन्ना आपल्या लेखनामुळे देखील चर्चेत राहते, परंतु त्यांची बहीण रिंकी खन्ना बॉलिवूड मध्ये आपली कारकीर्द नाही बनवू शकली. रिंकी खन्ना ने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत 10 चित्रपटे देखील नाही केले आहेत. आता त्या चित्रपट जगतापासून दूर आहेत.
काजोल मुखर्जी आणि तनिशा मुखर्जी– अभिनेत्री काजोल ला ओळखीची गरज नाही आहे. त्यांनी हिंदी चित्रपटात एकापेक्षा एक चित्रपटात काम केले आहे. अभिनेता शाहरुख खानसोबत त्यांची जोडी ही बॉलिवूड मधील शानदार जोडींपैकी एक आहे. तेच काजोलची बहीण तनिशा मुखर्जी आपल्या बहिणीसारखी लोकप्रिय नाही ठरू शकली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सन 2003 मध्ये आलेल्या Sssshhh… चित्रपटापासून केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटात काम केले परंतु तनिशा मुखर्जी यांना खास यश मिळाले नाही.
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी- अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी देखील बॉलिवूड मधील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे आणि हिट चित्रपट दिले आहेत. त्या लवकरच चित्रपट पडद्यावर पदार्पण करणार आहेत, परंतु शिल्पा शेट्टी यांची बहीण शमिता शेट्टी आपल्या बहिणी सारखी लोकप्रिय नाही ठरू शकली. शामिताची बॉलिवूड मध्ये फारशी खास कारकीर्द नाही राहिली. शमिताने मोहब्बतें या चित्रपटापासून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले होते. चित्रपट सुपरहिट ठरला होता तरी देखील त्यांची कारकीर्द फारशी खास नाही ठरली.