प्रसिद्ध शो ‘पवित्र रिश्ता’ ने घराघरात ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत यांच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांतच्या नि’धनापासून अंकिता लोखंडे बरीच चर्चेत आहे.
ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह राहते आणि तिची फॅमिली आणि सध्याचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत अनेकदा फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, तसेच चाहत्यांना ती खूप आवडते. अलीकडेच अंकिता लोखंडे पुन्हा एकदा तिचा प्रियकर विक्की जैनसोबत पार्टी करताना दिसली, ज्याची झलक तिने स्वत: सोशल मीडियावर शेअर केली आहे.
अंकिता लोखंडे ने आपल्या करिअरची सुरुवात झी टीव्हीची प्रसिद्ध सीरियल ‘पवित्र रिश्ता’ पासून केली होती. त्याच शोच्या सेटवर तीचा को-स्टार- पासून बॉयफ्रेंड सुशांतशी तीची ओळख झाली होती. या शोच्या शूटिंगदरम्यान दोघांची मैत्री झाली आणि लवकरच दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली.अंकिता आणि सुशांत यांनी सुमारे 6 वर्षे एकमेकांना डेट केेले होते.
तथापि, 2016 मध्ये या दोघांचेही मार्ग कायमसाठी विभक्त झाले होते. सुशांतच्या ब्रेकअपनंतर अंकिताला विक्की जैनच्या रुपाने एक नवीन प्रियकर मिळाला. विकास जैन उर्फ विक्की हा छत्तीसगडची राजधानी रायपूरचा असून मुंबईतील तो एक मोठा उद्योगपती आहे. तसेच विकी बॉक्स क्रिकेट लीग मधील मुंबई संघाचा को-ऑनर ही आहे. अंकिता आणि विकी बर्याच वेळेस एकमेकांशी बॉन्डिंग शेअर करताना दिसले आहेत.
आता अंकिता लोखंडे च्या पार्टीबद्दल बोलूया. खरं तर, 7 मार्च 2021 रोजी अंकिताने तिचा लव्हिंग बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत खूप मजा केली. यादरम्यान, अंकिताची सर्वात चांगली मैत्रीण रश्मी देसाईसुद्धा त्यांना जॉइन करण्यासाठी पोहोचली होती. अंकिता लोखंडे ने इन्स्टाग्राम अकाउंट स्टोरीवर आपल्या पार्टीचे काही व्हिडियो ही शीअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये ती आपला प्रियकर विक्की जैनसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.