कुठलेही कष्ट न घेता जसे च्या तसे हॉलिवूड पोस्टर कॉपी केल्याने टायगर श्रॉफची झाली गोची….

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मोस्ट unwanted फिल्म ‘हीरोपंती 2’ चे एक नवीन पोस्टर शेअर केले आहे. तसेच या चित्रपटाच्या पोस्टरबाबत नवीन चर्चा सुरू झाली आहे. होय, असे म्हटले जात आहे की प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे दुसरे पोस्टर हिटमन गेममधून कॉपी केले गेले आहे. टायगर श्रॉफने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे पोस्टर शेअर केले होते. सोशल मीडियावर हिटमॅन गेम चे पोस्टर कॉपी केलेलं आहे असे चाहते ट्विट करत आहेत.

टायगर श्रॉफ ज्या पद्धतीने चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दिसत आहे. तसे पाहिल्यावर लोकांनी ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर लिहिले, “हिटमॅन?” का? टायगर श्रॉफच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करीत असताना काही लोकांनी “हिटमॅनचे कव्हर”असे लिहिले आहे? त्याच वेळी, काही लोकांनी टायगर श्रॉफची खिल्ली ही उडविली, “एजंट 47: अच्छा चलता हूं दुआओं में याद रखना” असे लिहिले आहे.

2007 मध्ये रिलीज झालेल्या हिटमॅनमध्ये टिमोथी ओलीओ दिसले होते. त्यानंतर 2015 मध्ये या चित्रपटात रूपर्ट फ्रेंड दिसले होतेे. टायगरने चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करत असताना असे लिहिले आहे की, ‘माझं पहिलं प्रेम परत आले आहे – 3 डिसेंबरला सिनेमागृहात एकत्र पाहूया. ‘

‘हीरोपंती 2’ चे दिग्दर्शन अहमद खान करत आहे . ज्याने ‘बाघी 2’ आणि ‘बाघी 3’ मध्ये टायगरचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘हीरोपंती 2’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात तारा सुतारिया टायगरसह फीमेल लीडमध्ये दिसणार आहेे. हीरोपंती 2 चे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू झाले होते.

टायगर श्रॉफसाठी हा चित्रपट खास आहे कारण टायगरने हिरोपंतीबरोबर पदार्पण केले होते. हा चित्रपट वर्ष 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार व्यवसाय केला होता. त्याच वेळी या चित्रपटााा कृती सॅनॉन टायगरसोबत पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.