2 महिन्यांपूर्वी मौलाना सोबत लग्न करून आता पुन्हा आठवतोय एक्स-बॉयफ्रेंड.. अभिनेत्रीने केली भावनिक पोस्ट शेअर..

बॉलिवूड मध्ये चर्चेत राहण्यासाठी कलाकार काय काय करतील ह्याचा काही नेम नाही. आता कोरोनाकाळात तर चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत तर अश्या वेळी चर्चेत राहण्यासाठी अशे प्रकार सर्रास घडत आहेत. अश्याच एका घटनेने सध्या बॉलिवूड मध्ये खळबळ माजली होती, ते म्हणजे एका अभिनेत्रीने धर्मासाठी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.

होय, आम्ही बोलत आहोत अभिनेत्री सना खान बद्दल. काही दिवसांपूर्वी सना खानने धर्माच्या वाटेवर चालण्यासाठी बॉलीवूडला राम राम ठोकला होता. त्यानंतर बराच वेळ ती चर्चेत राहिली.. आता तेच प्रकरण शांत होत असतानाच दोन महिन्यांपूर्वी तिने एका मौलवी सोबत लग्न केल्याची बातमी जाहीर केली.

काही काळापूर्वी बॉलिवूडला निरोप देणारी सना खान काही ना काही कारणामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. त्यातल्या त्यात लग्नापासून तर सना खान अधिक चर्चेत आली आहे. सनाचे मौलाना सय्यद अनसशी लग्न झाल्यापासून ती सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.

ट्रोलर्सही सनाच्या आधीच्या रिलेशनशिप वरून तिला सतत लक्ष्य करीत असतात. सना चे या आधीही भरपूर रिलेशनशिप राहिलेले आहेत. नंतर तिने धर्मासाठी काम करण्याचं कारण देऊन बॉलिवूड सोडले. तआणि आता सनाने ट्रोलर्सना भावनिक पोस्टद्वारे हे सर्व ट्रोलिंग थांबवण्यास सांगितले आहे.

सना खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. लग्नापासून सना सतत तिच्या पतीबरोबरची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करत असते. ज्यामुळे सना खानला ट्रोल केले जात आहे. आता सानाने एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सानाने लिहिले आहे की तिचे हृदय तुटले आहे. यासह तीने तिच्या आधीच्या प्रियकराचे नाव न घेता त्याचा छुपा उल्लेख केला आहे.

सना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सनाने लिहिले की, ‘काही लोक बर्‍याच काळापासून माझ्याबद्दल नकारात्मक व्हिडिओ बनवत आहेत आणि या गोष्टी मी आतापर्यंत खूप संयमाने घेतल्या.

परंतु अलीकडेच मात्र माझ्या भूतकाळाशी संबंधित व्हिडिओ शेअर केल्या जात आहेत आणि त्यामध्ये बर्‍याच बकवास गोष्टी आहेत. आपणास ठाऊक नाही काय की एखाद्याने आपण आधी विसरलेल्या गोष्टीबद्दल त्याला पुन्हा आठवण करून देणे हे पाप आहे. माझे हृदय ह्या सगळ्या गोष्टींमुळे पिळवटून जाते’.

ही पोस्ट शेअर करताना सनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मला त्या व्यक्तीचे नाव सांगायचे नाही कारण त्याने माझ्याशी जे केले ते मला करण्याची इच्छा नाही, परंतु तो खूप वाईट आहे. आपण कोणालाही पाठिंबा देऊ शकत नसल्यास कमीत कमी शांत रहा.

अशी टिप्पणी देऊन कोणालाही नाराज करण्याचा हक्क तुम्हाला नाहीये. यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या भूतकाळाबद्दल पुन्हा दोषी वाटते. काही लोक आयुष्यात पुढे जातात, परंतु माझ्यासारख्या काहीजणांना असे वाटते की मी त्या काळात परत जाऊन गोष्टी बदलू शकेन. कृपया एक चांगल्या व्यक्ती व्हा आणि लोकांना माझ्याबरोबर बदलू द्या.

लग्नाआधी सना खान डान्स कोरिओग्राफर मेलव्हिन लुविसला डेट करत होती. सनाने मेलव्हिनवर तिच्यासोबत फसवणूक केल्याचा आरोप केला. ब्रेकअपनंतर सनाने याबाबत अनेक व्हिडिओ आणि पोस्ट्स शेअर केल्या आहेत.

काही दिवसांतच सना खानने फिल्म इंडस्ट्रीला निरोप दिला आणि 20 नोव्हेंबरला सैयद अनासबरोबर छुप्या पद्धतीने लग्न केले. लग्नानंतर सनाने तिचे सोशल मीडिया चित्र शेअर करत आपल्या लग्नाविषयी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.