बॉलिवूड मधील “ह्या” टॉप च्या लग्नाचा खर्च जाणून तुम्ही हैराण व्हाल, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा ने तर केले होते तब्बल…

बॉलिवूड स्टार्स असो किंवा व्यवसायाच्या जगाशी संबंधित असलेल्या काही मोठ्या सेलिब्रिटीज, आज प्रत्येकाच्या लग्नात पैसे पाण्यासारखा खर्च केला जातो. बॉलिवूड स्टार्सच्या लग्नाची चाहत्यांमध्ये खूप चर्चा आहे.

प्रियंका चोप्रा-निक जोनास – 105 कोटी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने वर्ष 2018 मध्ये अमेरिकन गायक निक जोनासबरोबर सात फेरे मारले. दोघांचा शाही विवाह जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये साजरा करण्यात आला. या दोघांचा लग्नाचा कार्यक्रम पाच दिवस चालला. असं म्हणतात की प्रियंका आणि निकच्या लग्नात 105 कोटी रूपये खर्च झाले आहेत.

दीपिका पादुकोण-रणवीर सिंग – 95 कोटी
आजच्या युगात हिंदी चित्रपटसृष्टीत रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणची जोडी चर्चेत राहिली आहे. दोन्ही कलाकार त्यांच्या कामात खूप एक्सपर्ट आहेत. या दोघांचे वर्ष 2018 मध्ये इटलीच्या लेक कोमो येथे विवाह झाले होते. दोघांच्या लग्नात 95 कोटी रुपये खर्च झाले.

अनुष्का शर्मा-विराट कोहली – 90 कोटी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न खूप चर्चेत होते. दोघांच्या लग्नाचा खर्च 90 कोटी झाला असल्याचे सांगितले जाते.डिसेंबर 2017 मध्ये अनुष्का आणि विराटने इटलीमध्ये सात फेरे घेतले. सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काच्या लग्नाच्या फोटोंनी बरीच प्रसिध्दी मिळवली. अलीकडे विराट-अनुष्का ‘वामिका’ या मुलीचे पालक बनले आहेत.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा – 80 कोटी
हिंदी सिनेमाची हिट आणि फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बिझनेसमन राज कुंद्राशी लग्न केले आहे. 2009 मध्ये दोघांनी सात फेरे घेतले. राज आणि शिल्पाच्या लग्नात 80 कोटी रुपये खर्च झाले होते. आज त्या दोघांना एक मुलगा वियान आणि एक मुलगी समिशा आहे.

असिन-राहुल शर्मा – 50 कोटी
दक्षिण भारतीय चित्रपटांशिवाय अभिनेत्री असिन हिने हिंदी चित्रपटातही काम केले आहे. अक्षय कुमार आणि सलमान खान सारख्या मोठ्या स्टार्स बरोबर तिने स्क्रीन शेअर केली आहे. असिनने मायक्रोमॅक्सचे सीईओ राहुल शर्माशी लग्न केले आहे. या लग्नात 50 कोटी रुपये खर्च झाल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी राहुलने साखरपुड्या मद्ये असिनला 5 कोटीची रिंग घातली होती.

अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय बच्चन – 40 कोटी
हिंदी सिनेमाची सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन ने 2007 साली अभिनेता अभिषेक बच्चन यांच्याबरोबर सात फेरे घेतले. बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाा मध्ये 40 कोटी खर्च झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.