आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बहुमानाचे स्थान आहे. त्याचे कारण आहे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले दिग्गज कलाकार. अर्थातच भारतात चित्रपट आणला तो सर्वपरिचित दादासाहेब फाळके या मराठी माणसानेच. त्यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या दिग्गजांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.
परंतु 90 च्या नंतरच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पाहिजे तसे सिनेमे बनवले गेले नाहीत. हा काळ चित्रपट सृष्टी साठी अतिशय खडतर होता. मग हळू हळू चित्रपटाची शैली बदलत गेली. नवीन तरुण दिग्दर्शकांना संधी मिळाली. या संधीचं सोनं करत अनेक नवीन प्रतिभावान दिग्दर्शक उदयास आले.
यात अनेक असे दिग्दर्शक आहेत त्यांचा उल्लेख करावा लागेल. रवी जाधव, सतीश राजवाडे, नागराज मंजुळे आणि इतर दिग्दर्शकांचा समावेश आहे. नागराज मंजुळे यांनी तर मराठी चित्रपटसृष्टीला नवीन रेकॉर्ड निर्माण करून दिले. आता तो हिंदीतही चित्रपट निर्मिती करत आहे.
त्यांच्या काही वर्षापूर्वी आलेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम निर्माण करत जवळपास शंभर कोटीच्या आसपास गल्ला जमवला होता. या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील करण्यात आला. यामध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिसली होती. मात्र, हिंदी चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. मात्र, याची दखल मात्र नक्की घेण्यात आली.
काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फॅन्ड्री चित्रपट निर्माण करण्यासाठी घेतला होता. याची कथा अतिशय ग्रामीण भागातील होती. तसेच नागराज मंजुळे यांचे चित्रपट हे ग्रामीण बाज असलेले असतात. या चित्रपटात काम करण्यासाठी नागराज मंजुळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अतिशय ग्रामीण बाज असलेल्या सोमनाथ अवघडे याची निवड केली.
सोमनाथ अवघडे याने चित्रपटात जब्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. तसेच या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटासाठी नागराज यांना अभिनेत्रीचा शोध होता. मात्र, ती काही केल्या सापडत नव्हती. एक वेळेस नागराज यांनी राजेश्वरी खरात हिला पुण्यात पाहिले होते.
त्यानंतर आपल्या चित्रपटात ही अभिनेत्री असावी त्यांना वाटले. मात्र, तिचा शोध लागत नव्हता. काही दिवसानंतर नागराज यांनी राजेश्वरीचा शोध घेतला. त्यांनी नगर जिल्ह्यातील ती राहत असलेले गाव शोधून काढले. सुरुवातीला राजेश्वरीच्या आईवडिलांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.
मात्र, मंजुळे यांनी त्यांना सर्व समजावून सांगितल्यानंतर त्यांनी देखील राजेश्वरी हिला चित्रपटात काम करण्यास संमती दिली. राजश्री हीचा या चित्रपटामध्ये एकही उच्चार नाही. तरीदेखील तिची भूमिका गाजली होती. या चित्रपटात तिने साकारलेले शालूचे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते.
2017 मध्ये राजश्री हिने आयटमगिरी या चित्रपटात देखील काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत हंसराज जगताप हा दिसला होता. राजश्री हिने तिचे शालेय शिक्षण पुण्यातील जोग इन्स्टिट्यूट येथे केले असून सध्या ती सिंहगड इन्स्टिट्यूट येथे बीकॉमचे शिक्षण पूर्ण करत आहे.
राजश्री तिच्या कुटुंबासोबत सध्या पुण्यात राहते आणि ती सध्या खूप सुंदर दिसत असून तिच्याकडे आगामी काही चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राजश्री हिला कुठल्याही अभिनयाची परंपरा नाही. तरीदेखील तिने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अफलातून यश मिळवले आहे.