बॉलीवूडच्या या कलाकारांचे एकमेकांशी आहे असे नातेसंबंध,आपल्याला नक्कीच माहित नसतील हे नाते सबंध!!

सामान्य माणसाला बॉलीवूड व बॉलीवूडचे अभिनेते व अभिनेत्रींबद्दल मनापासून जिव्हाळा व जिज्ञासा असते. बॉलिवुड स्टार्सच्या खाजगी जीवनाबद्दल आणि सवयीबद्दल कुठून ना कुठून माहिती काढण्याची सवय आपल्याला असते. बॉलीवूडच्या अभिनेत्यांना किंवा अभिनेत्रींना आपण स्टाईल आयकॉन म्हणून फॉलो करत असतो. बऱ्याच लोकांना फिल्मी स्टार्स व फिल्मजगताबद्दल जाणुन घेण्याची उत्सुकता असते तसेच खर्‍या जीवनामध्ये हे स्टार्स कसे वागतात याबद्दल माहिती घेण्याची प्रत्येकाला आवड व ईच्छा असते.

बॉलीवूड असो अथवा टॉलीवूड असो अनेक अभिनेते व अभिनेत्री हे एकमेकांचे नातेवाईक आहेत असे पाहायला मिळाले आहे. याबाबत त्यांच्या फॅन्स व फॉलोवर्सना माहीती नसते.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे फिल्मी दुनियेतील पाच अशा लोकांबद्दल माहिती सांगणार आहोत जे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

अल्लू अर्जुन आणि रामचरण –
टॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये म्हणजेच साउथ इंडियन सिनेमा इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि रामचरण हे ऍक्टर लोकांच्या सर्वात जास्त पसंतीचे अभिनेते आहेत. जर आपल्याला माहित नसेल तर आम्ही सांगू इच्छितो की, अल्लू अर्जुन आणि रामचरण हे नात्यांमध्ये एकमेकांचे भाऊ आहेत. अल्लू अर्जुन आणि रामचरण हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. मात्र त्यांच्यातील प्रेम अगदी सख्ख्या भावापेक्षाही जास्त आहे.

आलिया भट्ट आणि ईमराण हाशमी- आलिया भट्ट आणि इम्रान हाश्मी हे एकमेकांचे चुलत भाऊ-बहीण आहेत. आलिया भटचे वडील महेश भट यांची आई व ईमराण हाश्मीची आजी या एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहेत. यामुळे हे एकमेकांचे भाऊ बहीण आहेत. यामुळेच आलिया भटसोबत इमरान हाश्मीने कधीही कोणती फिल्म केली नाही.

आमिर खान आणि अली जफर-
पाकिस्तानी प्रसिद्ध सिंगर अली जाफर यांनी 2009 मध्ये आयेशा फाजली नावाच्या मुलीशी लग्न केले होते. आयशा फाजली ही आमिर खानची सख्खी चुलत बहीण आहे. या नात्याने आमिर खान हा अली जफरचा नात्याने साला-मेहुणा लागतो.

अर्जुन कपूर आणि श्रीदेवी –
अर्जुन कपूर हा बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तर श्रीदेवी ही बोनी कपूरची दुसरी बायको आहे. या नात्याने श्रीदेवी आणि अर्जुन कपूर एकमेकांचे मुलगा आणि आई आहे. श्रीदेवी या अर्जुन कपुरची सावत्र आई आहे मात्र श्रीदेवीच्या मृत्युनंतर व अगोदर देखील अर्जुन व श्रीदेवीचे नाते खुप प्रेमाचे होते.

राणी मुखर्जी आणि काजोल-
राणी मुखर्जी आणि काजल यांच्या बद्दल आपल्याला नक्कीच माहीत नसेल. मात्र आम्ही सांगू इच्छितो की, राणी मुखर्जी आणि काजोल यांचे आजोबा हे एकमेकांचे सख्खे भाऊ होते. या नात्याने राणी मुखर्जी आणि काजोल एकमेकींच्या बहिणी लागतात. बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते व अभिनेत्री हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र सामान्य माणसांना या गोष्टी माहीत नसतात.

Leave a Reply

Your email address will not be published.