‘सैराट’ मधील परश्या उर्फ आकाश ठोसर आता झालाय मोठा आर्मी ऑफिसर.. जाणून घ्या काय आहे किस्सा..

आपल्या मराठी चित्रपट सृष्टीला भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये बहुमानाचे स्थान आहे. त्याचे कारण आहे मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेले दिग्गज कलाकार. अर्थातच भारतात चित्रपट आणला तो सर्वपरिचित दादासाहेब फाळके या मराठी माणसानेच. त्यांच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर या दिग्गजांनी ही परंपरा पुढे कायम ठेवली.

परंतु 90 च्या नंतरच्या दशकात मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पाहिजे तसे सिनेमे बनवले गेले नाहीत. हा काळ चित्रपट सृष्टी साठी अतिशय खडतर होता. मग हळू हळू चित्रपटाची शैली बदलत गेली. नवीन तरुण दिग्दर्शकांना संधी मिळाली. या संधीचं सोनं करत अनेक नवीन प्रतिभावान दिग्दर्शक उदयास आले.

यात अनेक असे दिग्दर्शक आहेत त्यांचा उल्लेख करावा लागेल. रवी जाधव, सतीश राजवाडे, नागराज मंजुळे आणि इतर दिग्दर्शकांचा समावेश आहे. नागराज मंजुळे यांनी तर मराठी चित्रपटसृष्टीला नवीन रेकॉर्ड निर्माण करून दिले. आता तो हिंदीतही चित्रपट निर्मिती करत आहे.

त्यांच्या काही वर्षापूर्वी आलेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम निर्माण करत जवळपास शंभर कोटीच्या आसपास गल्ला जमवला होता. या चित्रपटाचा हिंदी रिमेक देखील करण्यात आला. यामध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिसली होती. मात्र, हिंदी चित्रपट काही खास कमाल करू शकला नाही. मात्र, याची दखल मात्र नक्की घेण्यात आली.

सैराट’ या सिनेमात परश्या ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता आकाश ठोसर एका रात्रीतून स्टार झाला आहे. सिनेमाची मुख्य भूमिका आर्ची अर्थातच अभिनेत्री रिंकू राजगुरु असली तरी डॅशिंग आर्चीला शोभणारा हीरो आकाशने उत्तम वठवला आहे. आकाशच्या अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केलं गेलं. पदार्पणाच्या सिनेमात त्याने दमदार भूमिका केल्याने मराठी इंडस्ट्रीला एक हँडसम हिरो मिळाला.

सैराट मधूनच आकाशने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला अगदी साधा दिसणारा आकाश आता मात्र पूर्णपणे बदलला आहे. एका हिंदी वेबसीरिजसाठी आकाशने आपल्या लूकवर मेहनत घेतली आणि त्याचा हा नवा लूक पाहून नेटकरी ही अवाक् झाले आहेत. आता लवकरचं आपल्या सर्वांचा लाडका परश्या बॉलीवूड मध्ये एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

‘१९६२ – द वॉर इन द हिल्स’ जी महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केली आहे ही वेबसीरिज २६ फेब्रुवारीला ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसीरिजमध्ये आकाशबरोबरच अभय देओल, सुमित व्यास हे दिग्गज देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजची कथा भारत-चीनमध्ये 1962 साली झालेल्या युद्धावर आधारित आहे.

आकाश या वेबसीरिजमध्ये किशन नावाच्या आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे. त्याच्यासाठी ही भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे. आकाशने प्रतिक्रिया दिली की ये सर्व त्यासाठी अगदीच स्वप्नवत आहे. खऱ्या आयुष्यात तर आर्मी ऑफिसर बनण्याचं स्वप्न मी पूर्ण करु शकलो नाही.

पण या सीरिजच्यानिमित्ताने मला ही संधी मिळत आहे. या वेबसीरिजच्या चित्रीकरणावेळी जेव्हा मी आर्मी ऑफिसरची वर्दी घालतो तेव्हा माझं मन अगदी आनंदाने भरुन यायचं. मला वास्‍तविक जीवनात मिळाली नाही तरी अभिनयात का होईना मला सैन्‍याचा पोशाख परिधान करण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप आनंद झाला.

ही वेबसीरिज म्हणजे आकाशसाठी खूप मोठी संधी आहे. या वेबसीरिजमधील आकाशचा लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या लूकमध्ये आकाश अगदीच वेगळा दिसतोय आणि अगदी एखाद्या आर्मी ऑफिसर सारखा दिसतोय. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.