अक्षय-अमीर सोबत चित्रपटामध्ये काम करणारी हि प्रसिद्ध अभिनेत्री आज करत आहे हे काम, जाणून आश्चर्य वाटेल

बॉलिवूड मध्ये अशा अनेक कलाकार आहेत त्यांनी बॉलिवूड मध्ये थोडा वेळ काम करून भरपूर पैसे मिळवले आहेत. आणि नंतर लग्न करून आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या कुटुंबासोबत आंनदी जीवन जगत आहेत. अशाच एक अभिनेत्री बद्दल आम्ही चर्चा करणार आहे. तिने अक्षय-अमीर सोबत काम करून नंतर ती आता करत आहे वेगळेच काम.

आयशा जुल्का या अभिनेत्रींचे नाव आहे. १९८३ मध्ये आयशाने आपल्या करिअरची सुरुवात केली. आयशाने 1991 मध्ये तिचा पहिला हिट चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटाने तिला बॉलिवूडमध्ये नाव मिळवून दिले. तिने एकामागून एक हिट चित्रपट दिले आणि ती दिग्दर्शकाची पहिली पसंती ठरली.

1992 मध्ये तिने आमिर खानसोबत काम केले. या चित्रपटाने तिला खूप लोकप्रिय केले. त्याच वर्षी तिने सुपरहिट चित्रपट ख़िलाड़ी मध्ये काम केले ज्यात तिने अक्षय कुमारसोबत काम केले आहे.

आयशा जुल्काने अक्षय कुमार, आमिर खान, सलमान खान, अजय देवगन, गोविंदा ई. उत्तम कलाकारांसह काम केले आहे . तिने आपल्या कारकीर्दीत एकूण 52 चित्रपटामध्ये काम केले आहे, त्यापैकी बरेच सुपरहिट हि झाले आहेत. तिने केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर उडिया, कन्नड आणि तेलगू चित्रपटातही काम केले आहे.

2006 पर्यंत बॉलिवूड मध्ये काम केल्यानंतर ती अचानक बॉलिवूड इंडस्ट्रीतून गायब झाली. 2003 मध्ये तिने गुप्तपणे व्यावसायिक समीर वाशी सोबत लग्न केले आणि काही काळानंतर पतीबरोबर व्यवसाय करण्यासाठी तिने बॉलिवूड इंडस्ट्री सोडली. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या लग्नाची घोषणा करून अचानक बर्‍याच लोकांची मने मोडली होती.

आज आयशाकडे कोटींची संपत्ती आहे. सध्या ती एक मोठी कंपनी चालवत आहे, ज्याला सम्रॉक डेव्हलपर्स म्हणतात. तिने पती समीर वाशी यांच्याबरोबर कंपनी सुरू केली होती. या कंपनीशिवाय आयशाचा अनंत नावाचा स्पाचा व्यवसाय देखील आहे.

ती एक उत्कृष्ट डिझाइनर देखील आहे. याव्यतिरिक्त आयशाचा गोव्यात बुटीक रिसॉर्ट देखील आहे. अभिनेत्री आयशा जुल्का आता स्वत: चा मॅन्युफॅक्चरिंग बिझिनेस आणि स्पा व्यवसाय चालवते.

Leave a Reply

Your email address will not be published.