शिल्पा पेक्षा सुंदर होती राज कुंद्राची पहिली बायको, पहा तिचे फोटो

शिल्पा शेट्टीचे लग्न प्रसिद्ध बिझनेसमन राज कुंद्रासोबत झाले असून त्या दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. आज राज कुंद्राबाबत आम्ही काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

राज कुंद्राचे शिल्पासोबत लग्न व्हायच्याआधी त्याचे लग्न झालेले होते आणि त्याला एक मुलगीदेखील आहे. राज कुंद्रा यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता कुंद्रा होते. 2006 च्या दरम्यान राज आणि कविता यांच्यात सतत वाद होत असल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

कविताने त्यांच्या घटस्फोटाविषयी शिल्पावर अनेक आरोप लावले होते. राज आणि कविता यांच्या घटस्फोटासाठी केवळ शिल्पा जबाबदार असल्याचे तिने म्हटले होते. राज आणि शिल्पा यांची एका परफ्यूमच्या प्रमोशनच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे बिझनेस पार्टनर बनले. त्यानंतर शिल्पा आणि राजच्या प्रेमकथेची चर्चा लगेचच मीडियात सुरू झाली होती.

त्याचदरम्यान कविताला राजने घटस्फोटाची नोटिस दिली होती. त्यावेळी त्यांची मुलगी डेलिना ही केवळ काहीच महिन्यांची होती. राज आणि कविता यांचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच महिन्यात शिल्पा आणि राज यांनी लग्न केले.

शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.

तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या कार्यक्रमाचा तिसरा सिझन काही महिन्यांपूर्वी संपला आहे. या कार्यक्रमातील तिचा अंदाज तिच्या प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.

शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. दरम्यानच्या काळात दोस्ताना यांसारख्या काही चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकली होती. पण २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या लाईफ इन मेट्रो आणि अपने चित्रपटानंतर ती कोणत्याच चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकली नव्हती. पण ती लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.

शिल्पा निकम्मा या चित्रपटाद्वारे कमबॅक करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे. शिल्पा तिच्या कमबॅकसाठी प्रचंड उत्सुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.